राज्यातील ‘या’ भागात ऐन दिवाळीत जोरदार पाऊस; ; मका, कापूस, तूरीचे मोठे नुकसान

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील गंगाथडी परिसरात शुक्रवारी जोरदार पाऊसाने हजेरी लावली. गतवर्षी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने, ढगफुटीच्या पावसाने हाहाकार उडाला होता. त्यावेळी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यात शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा मका, कापूस, तूर, मुग, भुईमूग, सोयाबीन, बाजरी, ऊस तसेच कडधान्ये, कांद्याचे अतोनात नुकसान झाले आहे. याआधी झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील बोरसर … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; ‘या’ जिल्ह्यात अनुदान वाटपास सुरुवात

औरंगाबाद –  औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांचे नुकसान झाले होते, आता शासनाकडून  अनुदान मिळाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ते वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे  त्यामुळे यंदाची शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचं दिसत आहे. यात दोन दिवसांत ३७ हजार ३५८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५ कोटी ५३ लाख ४९ हजार ४६२ रुपये जमा झाले. अजूनही … Read more

दिवाळीच्या तोंडावर जनतेची गैरसोय टाळा, एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे – अनिल परब यांचे आवाहन

मुंबई – एसटी ही सर्वसामान्य माणसांची जीवनवाहीनी आहे. दिवाळीच्या तोंडावर प्रवाशी जनतेची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी तसेच जनतेची एसटीवरील विश्वासर्हता जपण्यासाठी अघोषित संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर तातडीने रुजू व्हावे, जनतेची एसटीशी असलेली नाळ तुटू देऊ नका, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केले. श्री. परब … Read more

ऐन दिवाळीत एलपीजी सिलेंडरमध्ये मोठी दरवाढ

मुंबई – सर्वसामान्य दिवाळीवर चांगलीच संक्रांत आली आहे. महिन्याच्या आणि दिवाळीच्या पहिल्याच दिवशी गॅस दरवाढीच्या बातमीने सर्वांवर मोठा बॉम्ब फुटला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात आता 265 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. एक नोव्हेंबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीच्या दरात वाढ झाल्याची घोषणा केली आहे. ही वाढ … Read more

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करून महाविकास आघाडीने दिलेला शब्द पाळला, पण केंद्राचा शिपाईसुद्धा आला नाही

बीड : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले. राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानीची मदत दिली जाईल, असे असा शब्द महाविकास आघाडीने दिला होता. त्यानूसार राज्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीची मदत जाहीर केली आणि पहिला टप्पाही जिल्ह्यांना वर्ग केला. बीड जिल्ह्यातील सरासरी १५ टक्के शेतकऱ्यांना मदतही बँक खात्यावर जमा झाली आहे. महाविकास आघाडीने दिलेला शब्द पाळला. मात्र केंद्रातील शिपाईदेखील … Read more

दिवाळीपूर्वी खाण कामगारांना थकीत वेतन द्यावे – विजय वडेट्टीवार

चंद्रपूर – कर्नाटक पावर कॉर्पोरेशन लिमिटेड व बरांज कोल माईन्स येथे काम करणाऱ्या कामगारांचे वेतन दिवाळीपूर्वी देण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी खाण प्रशासनाला दिले. मागील 10 महिन्यांपासूनचे वेतन अद्यापही मिळाले नाही. परिणामी या कामगारांच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे. तरी दिवाळीपूर्वी कामगारांना तातडीने 4 महिन्याचे थकित वेतन देण्याची अंमलबजावणी  करावी, असे पालकमंत्री यांनी स्पष्ट केले. … Read more

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून मदत प्राप्त; दिवाळीपूर्वी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी – छगन भुजबळ

नाशिक – जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून तालुकास्तरावर मदत प्राप्त झाली असून त्यात येवला तालुक्यासाठी ४१.४३ लक्ष मदत मिळाली आहे. सर्व तालुक्यातील अधिकाऱ्यांनी दिवाळीच्या आत मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून लाखांचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ … Read more

दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल – दादाजी भुसे

अकोला – बियाण्यांच्या बाबतीत महाराष्ट्राची स्वयंपूर्णता व्हावी,हे ध्येय्य ठेवून राज्याचा कृषी विभाग नियोजन करून वाटचाल करीत आहे, अशी माहिती राज्याचे कृषी ,माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी  दिली. कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी अकोला जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध योजना आढावा घेतला, त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील समिती सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या … Read more

राज्यातील साखर कामगारांची दिवाळी गोड – हसन मुश्रीफ

मुंबई – महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी त्रिपक्षीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या बैठकांमध्ये राज्यातील साखर कारखान्यांमधील कामगारांच्या मागण्याबाबत सामजंस्य करार झाला. हा करार महाराष्ट्रातील साखर व उपपदार्थ उद्योगातील दिनांक 1 एप्रिल 2019 व त्यानंतर हजेरी पत्रकावर असलेल्या सर्व कायम, हंगामी कायम व हंगामी कामगारांना लागू करण्यात आला आहे. या … Read more

अन्नपदार्थांमधील भेसळीला प्रतिबंध करा – राजेंद्र शिंगणे

पुणे – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाई तसेच अन्य खाद्यपदार्थांचे मोठ्या प्रमाणात होणारे उत्पादन पाहता अन्न भेसळीची शक्यता लक्षात घेऊन अन्न प्रशासन विभागाने भेसळीस प्रतिबंध घालण्यासाठी दक्ष रहावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. शासकीय विश्रामगृहात आयोजित अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अन्न प्रशासनचे … Read more