देशात कोरोनाचा कहर; कोरोनाबाधितांच्या संख्येत तब्बल 65 टक्क्यांनी वाढ

मुंबई –  कोरोना (corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे (corona)  रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत. भारतात एकाच दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत 65 टक्क्यांनी वाढ झाली आहे

तर देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (corona )  13,154  नवीन रुग्ण आढळले आहेत. तर देशात गेल्या २४ तासात  कोरोनामुळे (corona )  268 लोकांचा मृत्यू झाला.  देशात सध्या  82,402  सक्रिय रुग्ण आहेत. तसेच  देशात ३ कोटी ४२ लाख ५८ हजार रुग्ण कोरोनामुक्त (Corona free) झाले आहेत. महाराष्ट्रात 252 आणि दिल्लीत 263 बाधितांची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

राज्यात मंगळवारी २१७२ कोरोनाबाधितांची नोंद  झाली होती. राज्यात गेल्या 24 तासांत ३९०० नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबई मध्ये गेल्या २४ तासात २५१० कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ओमायक्रॉनचे 33 रुग्ण सापडले आहेत.

महत्वाच्या बातम्या –