मनुक्का एक फायदे अनेक, जाणून घ्या

दाक्षे विशेष पद्धतीने सुकवली जातात. त्यातून मनुके तयार होतात. दाक्ष्याचे जवळजवळ सर्वच गुण मनुक्‍यात असतात. मनुका चवीस गोड असून, अनेक पदार्थांची रुची वाढविण्यासाठी मनुकांचा वापर केला जातो. मनुकात फायबर्स, प्रोटीन्स, ऍन्टी-ऑक्‍सिटंट, व्हिटॅमिन्स, भरपूर असतात. तसेच मनुकामध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट, थायमिन, व्हिटॅमिन बी-6 देखील आहे.चला तर जाणून घेऊ फायदे…..

  • मनुक्यामधील अँटिऑक्सिडेंट शरीरातील पेशीसांठी घातक असणाऱ्या फ्री रॅडिकल्सचे प्रमाण कमी करतात. यामुळे कॅन्सरपासून बचाव होतो
  • वसातून दोन वेळा मनुक्यांचे व्यवस्थित चावून सेवन केल्यास ते गळ्यासाठी फायद्याचे असते.
  • मनुका शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण मर्यादीत ठेवण्यास मदत करतो ज्यामुळे हृद्यविकाराची धोका कमी होतो.
  • मनुक्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने रक्तासंदर्भातील आजारांवर मनुका गुणकारी ठरतो. रात्री पाण्यात भिजत ठेवलेला मनुका सकाळी खालल्यास रक्ताच्या कमतरता संदर्भातील अॅनिमिया आजार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.
  • मनुक्यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. रोज एक चमचा मनुके लसणाच्या पाकळीसोबत खाल्ल्यास रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते.

महत्वाच्या बातम्या –