मेथीचे दाणे प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात नक्कीच असतात. मेथी जितकी तुमच्या स्वयंपाकात पदार्थांचा स्वाद वाढवते तितकीच ती तुमच्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. मेथीचे दाणे अनेक आजारांवर उपयोगी आहे. मेथीमध्ये कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, प्रोटीन आणि आयर्न अर्था लोह यासारखे अनेक पोषक तत्व आहेत. मधुमेहीग्रस्त लोकांसाठी आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण योग्य राखण्यासाठी मेथीचा उपयोग होतो. चला तर मग जाणून घेऊ फायदे……
- मेथीदाणे रात्रभर नारळाच्या गरम तेलात भिजवून ठेवा. सकाळी या तेलाने डोक्याला मसाज करा. हळू-हळू केस गळणे बंद होईल
- वय जसजसे वाढत जाते तसतसे सांधे सुजू लागतात, असह्य वेदना होते. याला सांधेदुखी किंवा संधिवात म्हणतात. याचा सामना करण्यासाठी, मेथी एक रामबाण उपाय आहे, जी शतकानुशतके वापरली जात आहे
- मेथीमध्ये लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस देखील आहे.म्हणून, मेथीचे औषधी गुणधर्म हाडे आणि सांध्यास आवश्यक पोषक प्रदान करतात
- अपचन किंवा बद्धकोष्ठता झाल्यास अर्धा चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घ्यावेत. थोडेसे मेथीदाणे सकाळ-संध्याकाळ पाण्यातून घेतल्यास बद्धकोष्ठतेची समस्या नष्ट होऊ शकते
- एक चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घेतल्यास अपचनाची समस्या दूर होते. मेथीचे दाणे आर्थरायटीस आणि साईटिका समस्यांवर रामबाण उपाय आहेत. सुमारे एक ग्राम मेथीदाण्यांची पावडर आणि सुंठ पावडर यांचे मिश्रण गरम पाण्यातून दिवसभर दोन-तीन वेळा घेतल्याने लाभ होतो.
महत्वाच्या बातम्या –