अहमदनगर : भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आज विद्युत कंपनीच्या कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. त्यांना वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वीजजोडणी महावितरणकडून तोडण्यात येत आहे. ही वीजतोडणी थांबवण्यात यावी यासाठी भाजपाच्या (BJP) वतीने नेवासा येथील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले. अधिकारी चर्चेसाठी आले मात्र कोणताही तोडगा न निघाल्याने संतप्त झालेल्या भाजपाच्या माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे (Balasaheb Murkute) यांनी खुर्चीवर उभा राहत गळफास लावला, यावेळी पायाखालची खूर्ची पडल्याने दोरी त्यांच्या गळ्याशी आवळली गेली, उपस्थितांनी प्रसंगावधान राखत वेळीच त्यांना उचलल्याने त्यांचा जीव वाचला.
सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून घडल्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे सोशल मिडीयावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून महावितरणविरोधात रोष व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. नेवासा येथील वीज तोडणीविरोधात भाजपातर्फे वितरण कार्यालयासमोर मंगळवारी आंदोलन करण्यात येत होते. यावेळी भाजपाकडून पुन्हा एकदा वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात येत होती. बाळासाहेब मुरकुटेदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदाेलनात अधिकाऱ्यांशी चर्चा करुनही मागणी मान्य होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या मुरकुटे यांनी नेवासा वीज वितरण कार्यालयात जाऊन गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
महत्वाच्या बातम्या –
- आनंदाची बातमी – एलपीजी गॅस सिलिंडरवरील अनुदान पुन्हा सुरू
- राज्यातील ‘या’ भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
- महत्वाची बातमी – शेततळ्यांना मिळणार ५२ कोटींचे अनुदान
- सावधान! पुढील 24 तासांत राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
- ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘शरद शतम् योजना’; टास्क फोर्सचा अहवाल सादर
- बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्र उभारणी योजनेचा लाभ घेण्याचे दादाजी भुसे यांचे आवाहन