Share

राज्यात आतापर्यंत तब्बल १३२.७६ लाख क्विंटल साखर उत्पादन

राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यात यावर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत तब्बल १४९ साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप सुरू केले आहे. तर यामध्ये राज्यातील ७५ खासगी व या मध्ये राज्यातील ७४ सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. तर राज्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत तब्बल १४९.४२ लाख टन उसाचे गाळप तयार करण्यात आले आहे.

राज्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत तब्बल १३२.७६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. अशी माहिती मिळाली आहे,  तर राज्याचा सरासरी साखर उतारा ८.८९ टक्के इतका आहे.

राज्यात यावर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत सर्वाधिक ३५ साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरु झाले आहेत. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, राज्यात यावर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल ३३.५८ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये २७.३५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील  साखर उतारा ८.१४ टक्के आहे.

महत्वाच्या बातम्या – 
साखर मुख्य बातम्या

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon