वर्धा – जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत वैरण पिकाची लागवडीसाठी अनुदान, दुधाळ जनावरांचे अनुदानावर वाटप आणि प्रशिक्षण योजना अशा विविध योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पशुपालकांनी ३१ ऑगस्टपर्यंत संबधित पंचायत समितीत अर्ज करावा, असे आवाहन कृषी व पशुसंवर्धन सभापती माधव चंदनखेडे आणि पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा डायगव्हाने- गुल्हाने यांनी केले आहे.
तुप खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहीत आहेत का?
दुग्ध उत्पादन वाढीसाठी व तसेच भविष्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत बहुवार्षिक वैरण पिकांची लागवड करण्याकरिता प्रती लाभार्थी १ हजार ५०० रुपयांच्या मर्यादेत १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे यांचे वितरण पशुपालकांना करण्यात येणार आहे असे ते म्हणाले आहे. अनुसूचित जाती आणि आदिवासी समाजाच्या शेतकरी व पशुपालकांना उत्पन्नाचे स्रोत निर्माण होण्याकरिता ७५ टक्के अनुदानावर दोन दुधाळ जनावरांचे (गाई-म्हशी) वाटप करण्यात येईल.
कारले लागवड कशी करावी, जाणून घ्या
पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण ही योजना केवळ अनुसूचित जातीच्या शेतकरी पशुपालकांकरिता १०० टक्के अनुदानावर ३ दिवसासाठी मोफत प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहे. सदर योजना राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम विचारात घेऊन विविध योजनाकरिता मंजूर अर्थसंकल्पित निधीपैकी फक्त ३३ टक्के निधीच्या अधीन राहून राबविण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या –