कांदा हे व्यापारिदृष्टया सर्वात महत्वाचे भाजीपाला पिक आहे. आपल्याला कांदा हा रोजच्या आहारात लागतो. भारतीयांच्या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. कांदा पिकविणा-या राज्यात क्षेत्र व उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 1.00 लाख हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते.
तसेच महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर, सातारा हे जिल्हे कांदा पिकविण्याबाबत प्रसिध्द आहेत. तसेच मराठवाडा विदर्भ व कोकणात सुध्दा काही जिल्हयांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रात नव्हे तर सबंध भारतात कांदा पिकविण्यात प्रसिध्द आहे. एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्रातील 37 टक्के तर भारतातील 10 टक्के कांद्याचे उत्पादन एकटया नाशिक जिल्हयात घेतले जाते.
तसेच या वर्षीच्या हंगामात नाशिक जिल्ह्यातील येवला बाजारसमितीमध्ये प्रथमच लाल कांद्याची आवक झाली. केवळ दोनच वाहनांतून या कांद्याची आवक झाली आहे. तरी देखील या वाहनांचे जग्गी स्वागत बाजारसमितीमध्ये करण्यात आले होते. तसेच या लाल कांद्याला पहिल्याच दिवशी तब्बल 2301 रुपये असा दर मिळाला आहे.
आपल्याकडे या लाल कांद्याला एक वेगळे महत्व आहे. जरी आवक कमी प्रमाणात असली तरी लाल कांद्याला मिळालेला दर हा शेतकऱ्यांसाठी समाधानकारक आहे.
लासलगाव आणि नाशिक बाजारपेठेतच कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. लाल कांदा हा आता साठणूकीतला अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येवला बाजार समितीमध्ये आवक सुरु झाली आहे. तसेच खरीपातील लाल कांदा अजूनही बाजारपेठेत दाखल झालेला नाही, आणि साठवणूकीतला कांदाही आता अंतमि टप्प्यात आहे. त्यामुळे आता कांद्याचे दर पुन्हा वाढणार असा अंदाज वर्तवला जात आहे.
तसेच यावर्षी पावसामुळे खरीप हंगामातील कांद्याचे खूप नुकसान झाले आहे. तसेच त्याची काढणी देखील लांबणीवर पडलेली आहे. त्यामुळे आता बाजारपेठेतील कांद्याची आवक ही घटत आहे. खऱिपातील कांदा बाजारात येण्यासाठी बराच आवधी लागणार आहे. तसेच साठवणुकीतलाही कांदा आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येवला बाजार समितीमध्ये गुरुवारी दाखल झालेल्या कांद्याला 2301 रुपये असा दर मिळालेला आहे आणि कांद्याचे दर पुन्हा वाढणार असा अंदाज देखील वर्तवला जात आहे.
- राज्यात सर्व खाद्यतेल व तेलबियांवरील साठवणुकीवर निर्बंध नाहीत
- आनंदाची बातमी – एलपीजी गॅस सिलिंडरवरील अनुदान पुन्हा सुरू
- केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सोयाबीन, कापसाच्या प्रश्नांसंबंधी राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार
- राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान
- केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सोयाबीन, कापसाच्या प्रश्नांसंबंधी राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार
- मांसाहार आणि सप्लिमेंटपेक्षा मक्याच्या ‘या’ वाणात मिळेल तब्बल 250 टक्के जास्त प्रोटीन