Share

शेंगदाणे खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

शेंगदाणा प्रत्येकालाच आवडतो. त्यात अनेक औषधी गुणही आहेत. तसेच अनेक लोक तयार केलेल्या पदार्थातून शेंगदाणे वेचून खातात. कु्णाला तळलेले शेंगदाणे आवडतात तर कुणाला भाजलेले शेंगदाणे आवडतात. शेंगदाण्यामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन असतात. मुठभर शेंगदाण्यामध्ये योग्य प्रमाणात कॅलरीज,कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन असतात. तसेच शेंगदाण्यापासून व्हिटॅमिन इ, के, आणि बी6 भरपूर प्रमाणात मिळतात. चला तर जाणून घेऊ फायदे…..

‘ही’ आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, जाणून घ्या फायदे

  • भिजलेले शेगदाणे ब्लड सर्कुलेशन कंट्रोल करून शरीराला हार्ट अटैक सोबत अनेक हार्ट प्रोब्लेम पासून वाचवते.
  • आठवड्यातले काही दिवस शेंगदाणे खाल्ल्यास हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी राहतो. त्यामुळे शेंगदाणे जरी टाईमपास म्हणून खात असाल तर रोज हा टाईमपास करायला हरकत नसावी. तसेच शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होऊन ते नियंत्रणात राहते.
  • हल्ली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे उपाय करतात. त्यात अनेक टॉनिक वगैरे घेतात. मात्र हे सगळं करणं आता बंद करा आणि शेंगदाण्याचे योग्यरित्या सेवन करा.

‘या’ ठिकाणी पावसाचा जोर वाढणार

  • ओला खोकला असल्यास त्यावर शेंगदाणा उपायकारक ठरतो. यामुळे पाचनशक्तीही वाढते तसेच भूक न लागण्याची समस्याही दूर होते.
  • शेंगदाणे तेलकट असतात. शेंगदाणे आणि गुळ एकत्र खाल्ल तर हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. गुळ आणि शेगदाण्यात प्रोटीन, कार्बोहाटड्रेट्स असतात. त्यामुळे शेंगदाणे आणि गुळ रोज खाणं आरोग्यदायी आहे.
  • शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिज, व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळून येते. यामुळे याच्या सेवनाने त्वचा नेहमी तरुण दिसते. तुमची त्वचा ड्राय असेल तर शेंगदाण्याने ड्राय स्कीनच्या सगळ्या समस्या दूर होतात.

महत्वाच्या बातम्या –

कडुलिंबाचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

ड्रॅगन फ्रुटचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

आरोग्य मुख्य बातम्या विशेष लेख

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon