गुडघेदुखीचा त्रास भयंकर असतो. जे जे या त्रासातून गेलेत किंवा जात आहेत ते हे लगेच मान्य करतील. एकदा गुडघेदुखी मागे लागली की ती कायमचीच असं म्हटलं तर त्यात अतिशयोक्ती आजिबात नसेल. गुडघेदुखीच्या त्रासामुळे ना धड उभं राहता येतं ना चालता येतं, यामुळे आपल्या अगदी रोजच्या जगण्यावर सुद्धा या गोष्टीचा विपरीत परिणाम होतो. आणि दुखण्याबरोबरच आपल्याला एकप्रकारचा न्यूनगंड सुद्धा येतो कारण कुठे बाहेर गेलं आणि चालायला लागलं तर गुडघे दुखतात. चला तर मग जाणून हेऊ घरगुती उपाय…..
- दुध आणि दुधा पासून बनलेले पदार्थ भरपूर खावेत आणि कच्चे पनीर आपल्या भोजनात शामाविष्ट करावे असे केल्यामुळे तुम्हाला सांधेदुखी मध्ये आराम मिळेल.
- एक लहान चमचा सूंठ पावडरमध्ये मोहरीचे तेल मिसळा. याची पेस्ट तयार करून दिवसातून दोनदा लावा. काही तासाने धुऊन टाका.
- हळद तर अनेक रोगांवरचा इलाज आहे, हळद आणि दूध असं एकत्र घेतल्यावर जखमा लवकर भरून येतात आणि त्यामुळे दुखणं सुद्धा कमी होतं.
- बदाम, 5 काळी मिरी, 10 मनुका आणि 6 अक्रोड गरम दुधासोबत सेवन करावे. हा प्रयोग केल्याने आराम मिळेल
- दुखऱ्या गुडघ्याला बर्फाचा शेक द्या. शेक देताना बर्फाचा तुकडा थेट त्वचेवर न लावता एका रुमालात गुंडाळून घेऊन शिकावं.
- जर थंडीमुळे तुमच्या घरातील वृद्ध लोकांचे गुडघे दुखत असतील तर राईच्या तेलात लसून आणि ओवा शिजवा आणि मंग हे तेल कोमट झाल्यावर गुडघ्यावर मालिश करा, यामुळे वेदना त्वरित कमी होईल.
- सफरचंद, मोसंबी, संत्रे, टरबूज, खरबूज, केळे आणि नारळ इत्यादी फळांचे सेवन दररोज करा
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात उद्यापासून पावसाला होणार सुरूवात; ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
- सौंदर्य खुलवणारे आहेत ‘हे’ लिंबूचे उपाय ! जाणून घ्या
- राज्यात आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस
- ‘या’ तारखेपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरूवात होणार
- ‘हा’ उपाय करून एका मिनिटात घालवा दातांचा पिवळेपणा!
- काकडी लागवड पद्धत, माहित करून घ्य