केसगळतीवर घरगुती गुणकारी उपाय, जाणून घ्या

जर तुम्ही केसगळतीने त्रस्त आहात आणि तुम्हाला नैसर्गिक उपचार पद्धतीने त्यावर मात करायची आहे तर मग ‘जास्वंद’ नक्कीच किफायतशीर आहे. फॉसफरस, कॅल्शियम व व्हिटामिन सी ने समृद्ध जास्वंदाचे फुल तर कॅरोटीन जास्वंदाच्या पानात असल्याने केस गळती, अकाली केस पांढरे होणे, केसातील कोंडा यापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. रोज जास्वंदाचा वापर केल्यास अधिक लवकर आराम मिळतो.

केसगळतीवर परिणामकारी जास्वंद

  • जास्वंदाची पाने व फुले केसगळतीच्या समस्येवर नैसर्गिकरीत्या परिणामी आहेत.
  • जास्वंद केसांची वाढ करतात व टाळूचा रक्तपुरवठा वाढवतात
  • जास्वंदातील कॅल्शियम व व्हिटामिन सी मुळे केसांची घट्ट होतात

घरीच बनवा जास्वंदाचा हेअर पॅक

जास्वंद आणि खोबरेल तेल – काही जास्वंदाची फुले कुटून तीळ अथवा खोबऱ्याच्या तेलात घालून मिश्रण एकत्र करा. हे मिश्रण काही तासांसाठी केसांना लावून ठेवा. थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा.

जास्वंद आणि ऑलिव तेल – जास्वंदाचा वापर तुम्ही रोज शाम्पू म्हणून करू शकता. जास्वंद, पाणी आणि ऑलिव तेल एकत्र करा तुमचा शाम्पू तयार. खलबत्यात 2-3 जास्वंदाची फुले व पाने घ्या त्यात थोडं ऑलिव तेल व पाणी घालून कुटून घ्या हे मिश्रण 15-20 मिनिट मुळांपासून टोकापर्यंत लावा व नंतर कोमट पाण्याने केस धुऊन टाका.

जास्वंद आणि आवळा– जास्वंद आणि आवळा केसगळती थांबवण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. कुटलेली जास्वंदाची फुलं आणि आवळा पावडर पाणी घालून एकत्र करा. हे मिश्रण केसांना मूळापासून लावा व पूर्णपणे सुकल्यानंतर ते धुऊन टाका. ही उपचार पद्धती केस गळती पूर्णपणे थांबवून केसांच्या वाढीस मदत होईल.

महत्वाच्या बातम्या –