केळाच्या सालीचे सेवन शरीरासाठी पोषक ठरते का? माहित करून घ्या

केळ हे साधारणतः सगळ्यांचेच आवडते फळ असते. केळाचे सेवन केल्याचे शरीरावर होणारे अनेक फायदे दिसून येतात उदाहनार्थ शरीरात उर्जा निर्माण करण्यासाठी , ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास किवा थकवा येत असल्यास केळाचे सेवन करावे. परंतु केळीच्या सालीचे सेवन केल्याने देखील शरीरावर अनेक फायदे होतात.

केळीच्या सालीचे सेवन केल्याने शरीरावरील चरबी कमी करता येते. आहारतज्ञांच्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला केळातील पोषक तत्वांचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा असेल तर केळीचे साल खाणे सुधा तितकेच महत्वाचे आहे. केळीच्या सालीमध्ये फायबर हे मोठ्या प्रमाणत आपल्याला आढळते. ऑस्ट्रेलियातील आहारतज्ञांच्या सल्ल्यानुसार केळीच्या सालीचे सेवन केल्याने विटामिन बी6 शरीरास मिळते.

केळीच्या सालीचे रोज एकदा सेवन केल्याने महिन्याभरात सुमारे २ ते ३ किलो इतके वजन घटण्यास मदत होते. आणि तेही कोणतेही कष्ट न घेता. सॉल्युबल आणि इनसॉल्युबल असे दोन प्रकारचे फायबर केळीच्या सालीमध्ये आढळते. ज्याचा शरीरातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.

त्याचबरोबर केळीची साल हळुवार चेहेऱ्यावर चोळल्यास चेहेऱ्यावरील मुरुमं व पुटकुळ्या नाहीश्या होण्यास मदत होते. तसेच केळीच्या सालीने चेहेऱ्यावर हळुवार मसाज केल्याने चेहेऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

महत्वाच्या बातम्या –