Share

‘हे’ घरगुती उपाय केल्याने दूर होईल गुडघेदुखी, जाणून घ्या

Published On: 

🕒 1 min read

गुडघेदुखीचा त्रास भयंकर असतो. जे जे या त्रासातून गेलेत किंवा जात आहेत ते हे लगेच मान्य करतील. एकदा गुडघेदुखी मागे लागली की ती कायमचीच असं म्हटलं तर त्यात अतिशयोक्ती आजिबात नसेल. गुडघेदुखीच्या त्रासामुळे ना धड उभं राहता येतं ना चालता येतं, यामुळे आपल्या अगदी रोजच्या जगण्यावर सुद्धा या गोष्टीचा विपरीत परिणाम होतो. आणि दुखण्याबरोबरच आपल्याला एकप्रकारचा न्यूनगंड सुद्धा येतो कारण कुठे बाहेर गेलं आणि चालायला लागलं तर गुडघे दुखतात. चला तर मग जाणून हेऊ घरगुती उपाय…..

  • दुध आणि दुधा पासून बनलेले पदार्थ भरपूर खावेत आणि कच्चे पनीर आपल्या भोजनात शामाविष्ट करावे असे केल्यामुळे तुम्हाला सांधेदुखी मध्ये आराम मिळेल.
  •  हळद तर अनेक रोगांवरचा इलाज आहे, हळद आणि दूध असं एकत्र घेतल्यावर जखमा लवकर भरून येतात आणि त्यामुळे दुखणं सुद्धा कमी होतं.
  • दुखऱ्या गुडघ्याला बर्फाचा शेक द्या. शेक देताना बर्फाचा तुकडा थेट त्वचेवर न लावता एका रुमालात गुंडाळून घेऊन शिकावं.
  • जर थंडीमुळे तुमच्या घरातील वृद्ध लोकांचे गुडघे दुखत असतील तर राईच्या तेलात लसून आणि ओवा शिजवा आणि मंग हे तेल कोमट झाल्यावर गुडघ्यावर मालिश करा, यामुळे वेदना त्वरित कमी होईल.
  • सफरचंद, मोसंबी, संत्रे, टरबूज, खरबूज, केळे आणि नारळ इत्यादी फळांचे सेवन दररोज करा.

महत्वाच्या बातम्या –

आरोग्य बातम्या (Main News) विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या