रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते मात्र भौतिक सुपिकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे.
देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शेतकरी बांधवांना अन्नधान्याची पूर्तता करण्यासाठी अधिकाधिक पिके घेणे तसेच आहे त्याच जमिनीवर प्रति हेक्टरी उत्पादन वाढविणे अनिवार्य आहे. परंतु असे असले तरी ज्या पद्धतीने रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढला आहे, त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहे. दिवसेंदिवस जमिनीची उपजाऊक शक्ती कमी होत आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या घटून त्या मृतप्राय झालेल्या आहेत. शेतजमिनीची भौतिक, रासायनिक व जैविकदृष्टय़ा अपरिमित हानी होत आहे.
केंद्र सरकार नवी योजना; शेती अवजारांसाठी देणार ८०% अनुदान, असा घ्या लाभ
शेतकऱ्याचा उत्पादन खर्च मोठय़ा प्रमाणावर वाढला असून तो कर्जबाजारी होत आहे. वर्षांनुवष्रे एकाच जमिनीत एकाच पिकाची लागवड केली जाते. त्यामुळे जमिनीत पाण्याचा वापर वाढला आहे. दिवसेंदिवस शेत जमिनीचे प्रमाण कमी होत असून अन्नधान्याची गरज मात्र वाढतच आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी उपलब्ध जमिनीचा अधिकाधिक वापर करावा लागणार आहे. त्यासाठी ही जमीन दीर्घकाळ जिवंत, सुपीक ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
गांडूळ खतात असणारे महत्त्वाचे घटक
गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण हे ४० ते ५० टक्के असते. यस मध्ये ४० ते ५७ टक्के कार्बन, ४ ते ८ टक्के हायड्रोजन, ३३ ते ५४ टक्के ऑक्सिजन, ०.७ ते पाच टक्के सल्फर व दोन ते पाच टक्के नत्र असते. गांडूळ खतामध्ये मोनोसॅक्रेईडीस, पॉलिसॅकॅराइड्स यासारखी पिष्टमय पदार्थ असतात. अमिनो आम्ले व प्रथिने, स्निग्ध पदार्थ, न्यूक्लिक ॲसिड व ह्युमसचे प्रमाण सर्वाधिक असते व ते पिकांना उपयोगी ठरते.
गांडूळ खतामध्ये ०.८ टक्के नत्र, ५७ टक्के स्फुरद. १ टक्के पालाश तसेच मॅग्नीज, झिंक, कोपर, बोरॉन यासारखी सूक्ष्म द्रव्य मोठ्या प्रमाणात असतात. गांडूळाच्या विष्टेत नत्राचे प्रमाण व जमिनीच्या पाच पटीने जास्त असते. स्फुरदचे प्रमाण व जमिनीच्या सात पट असते तसेच पालाशचे प्रमाण अकरा पटीने जास्त असते. वरील घटक सगळ्या प्रकारच्या पिकांना आवश्यक आहे व गांडूळ खताच्या वापरामुळे ते पिकांना सहजासहजी उपलब्ध होतात.
राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज
गांडूळ खत वापराचे फायदे
- गांडूळ खत वापरल्यामुळे जमिनीचा पोत चांगला प्रमाणे सुधारतो.
- मुळ्या अथवा झाडांना कुठल्याही प्रकारची इजा न होता जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते.
- जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
- गांडूळ खत वापरल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन फार कमी प्रमाणात होते.
- जमिनीचा सामू योग्य पातळीत राखला जातो.
- गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवितात.
- गांडूळ खत वापरामुळे उपयुक्त जिवाणूंच्या संख्येमध्ये वाढ होऊन खते व पाण्याच्या खर्चात बचत होते.
- झाडाची निरोगी वाढ होऊन किडींना व रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता वाढते.
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी – राज्यात लवकरच तलाठी भरती होणार
1 लाख 40 हजार रिक्त पदांसाठी रेल्वेकडून डिसेंबरमध्ये परीक्षा