मुंबई : राज्यातील अनेक शेतकरी चिंतेत आहे कारणं महावितरण कंपनीने शेतीच्या वीजबिल वसुलीसाठी शेतीचा वीजपुरवठा तोडण्याची मोहिम हाती घेतली आहे. यामुळे शेतीला वीजपुरवठा मिळत नसल्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला असून शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, यावर भाजपा आमदार राम सातपुते यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला आहे.
याबाबत आमदार राम सातपुते ट्विट करत म्हणाले कि, राज्यातील लुटारू वसुली सरकारने शेतकऱ्यांची लाईट तोडली, पीक पाण्यावाचून जळाली, जनावरांना पाण्यावाचून तडफडायला लावलं. शेतकरी या सगळ्याचा हिशोब ठेऊन या सत्ताधार्यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही.! अशी टिका राम सातपुते यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.
राज्यातील लुटारू वसुली सरकारने शेतकऱ्यांची लाईट तोडली,पीक पाण्यावाचून जळाली, जनावरांना पाण्यावाचून तडफडायला लावलं.
शेतकरी या सगळ्याचा हिशोब ठेऊन या सत्ताधार्यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही.! @OfficeofUT @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis— Ram Satpute (@RamVSatpute) December 1, 2021
अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत. त्यातच राज्यातील महाविकास आघाडी सरकारला महिती असतानादेखील महावितरण शेतकऱ्यांकडील थकीत वीजबिल वसुलीसाठी कृषी पंपाचा वीजपुरवठा तोडण्याचे काम करत असल्याने विरोधीपक्ष आक्रमक झाले आहेत.
यामुळे महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. मोर्चे रास्ता रोकोही केले जात असून अद्याप राज्यशासनाने यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे प्रचंड टीका होताना दिसत आहे.
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाने लावली हजेरी
- सौंदर्य खुलवणारे आहेत ‘हे’ लिंबूचे उपाय ! जाणून घ्या
- ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्यात पुन्हा निर्बंध
- अंड्यातून नेमकं काय मिळते? जाणून घ्या एका क्लिकवर.
- दररोजच्या जेवणात पनीरचा समावेश करत असाल तर मग जाणून घ्या ‘हे’ फायदे
- आजपासून निवासी, आश्रमशाळा सुध्दा सुरू होणार – विजय वडेट्टीवार