मोठी बातमी – एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ; ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ

मुंबई : आता एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये प्रत्येकी 100 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, दिलासादायक म्हणजे ही वाढ केवळ व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये झाली आहे.

सध्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीने आभाळ गाठल आहे. त्यातच आता एलपीजी गॅस सिलेंडरच्या  किंमतीतही वाढ आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये वाढ झाल्याने सध्या नव्या दरानुसार, दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 2100 रुपये झाली आहे. मुंबईमध्ये सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 2051 झाली आहे. तर, कोलकातामध्ये 2174.50 रुपये झाला आहे. तर, चेन्नईमध्ये सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किमंत 2234 रुपये झाली आहे.

मागील काही महिन्यांपासून गॅस सिलेंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता पुन्हा गॅस 100 रुपयांनी वाढला आहे. 2 महिन्यांपूर्वी व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1733 रुपये इतकी होती. ती आता 2100 इतकी झाली आहे. त्यामुळे केवळ 2 महिन्यांच्या कालावधीत गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल 467 रुपयांची वाढ झाली आहे.

दरम्यान, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. मात्र, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती अजूनही स्थिर आहेत. याचा मोठा आर्थिक फटका व्यावसायिकांना बसणार आहे.

महत्वाच्या बातम्या –