राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न – अशोक चव्हाण

मुंबई – राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून २ हेक्टरपर्यंत जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर तसेच बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर अशी १० हजार कोटींची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. अशी माहिती मदत व पुर्णवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. त्यावर शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १० हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली होती. राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे ५५ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटातून बाधित झालेल्या शेतकऱ्यांना या माध्यमातून मदत केली जाणार आहे.

त्यामुळे मदतीचा पहिला टप्पा हा मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यात प्राधान्याने वर्ग करण्यात येत आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा लवकरात लवकर मदत देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांवरील संकट मोठं असलं तरी महाविकास आघाडी सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.

शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांची दिवाळी गोड करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले, त्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना या पैश्याची मदत होवून आधार मिळावा हा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे.

महत्वाच्या बातम्या –