महाविकास आघाडीचे खासदार संसदेच्या अधिवेशात सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार – अजित पवारांची ग्वाही

मुंबई – सोयाबीन, कापूस उत्पादकांसह राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सोयाबीनसह कापसाच्या प्रश्नांसंबधी राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनात महाविकास आघाडीचे खासदार यासंबंधीचे प्रश्न सभागृहात मांडतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांवर तात्काळ गुन्हे नोंद … Read more

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करून महाविकास आघाडीने दिलेला शब्द पाळला, पण केंद्राचा शिपाईसुद्धा आला नाही

बीड : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले. राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानीची मदत दिली जाईल, असे असा शब्द महाविकास आघाडीने दिला होता. त्यानूसार राज्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीची मदत जाहीर केली आणि पहिला टप्पाही जिल्ह्यांना वर्ग केला. बीड जिल्ह्यातील सरासरी १५ टक्के शेतकऱ्यांना मदतही बँक खात्यावर जमा झाली आहे. महाविकास आघाडीने दिलेला शब्द पाळला. मात्र केंद्रातील शिपाईदेखील … Read more

राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न – अशोक चव्हाण

मुंबई – राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून २ हेक्टरपर्यंत जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति … Read more

महाविकास आघाडी सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे – आदित्य ठाकरे

मुंबई – राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण  यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली. राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील … Read more