जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी व्यापक धोरण करा – नितीन राऊत यांचे बैठकीत निर्देश

नागपूर – नागपूर जिल्ह्यात पेंच, कर्हांडला, मोगरकसा सारखे पर्यटन स्थळांकडे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व्यापक धोरण तयार करावे, असे निर्देश नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले.

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकार्यांची बैठक झाली. यावेळी आमदार आशीष जयस्वाल, जिल्हाधिकारी आर. विमला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागपूर जिल्ह्याचे जंगल  मध्यप्रदेशाला लागून आहे. मध्यप्रदेशातील अभयारण्य व जंगल सफारीला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ असतो. परंतु आपल्याकडे चांगल्या स्थळे असताना सुद्धा पर्यटकांना संख्या कमी असल्याचे डॉ. राऊत यांनी निदर्शनास आणून दिले. या संदर्भात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तेथे नागरी सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तयार करण्यात याव्या, नागपूरहून तेथे पोहोचण्यासाठी दळणवळणाची साधने उपलब्ध करणे गरजेचे आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन एक व्यापक अहवाल तयार करावे, असे निर्देश डॉ. राऊत यांनी दिले.

यामुळे नागपूर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल तसेच रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध होईल, असेही डॉ. राऊत यांनी यावेळी सांगितले. पर्यटन स्थळाच्या परिसरात अखंडीत वीज पुरवठा देण्यासाठी नवे उपकेंद्रे उभारण्याचे निर्देश डॉ. राऊत यांनी दिले.

शेतमजुरांना प्रकल्पग्रस्त घोषित करा

नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्पांमध्ये शेतमजूर करणार्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून जाहीर करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

रामटेक व पारशिवनी तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत आमदार आशीष जयस्वाल यांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी सालेघाट गावाचे पुनर्वसनाचा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. पेंच प्रकल्पात शेती गेलेल्या शेतकर्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून घोषित केले आहे. परंतु या परिसरात भूमीहीन असलेल्या शेतमजुरांना प्रकल्पग्रस्तांचा दर्जा न मिळाल्याने त्यांना शासकीय योजनांचा कोणताही फायदा मिळत नसल्याचे यावेळी निदर्शनास आल्यानंतर पालकमंत्री डॉ. राऊत यांनी शेतमजूर सुद्धा शेतीवर अवलंबून राहत होते. शेती गेल्यामुळे त्यांचेही उत्पन्नाचे साधन हिरावून घेतल्याने त्यांनाही प्रकल्पग्रस्त म्हणून घोषित करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.  

वेकोलित स्थानिकांना रोजगार द्या

वेस्टर्न कोलफिल्ड लिमीटेडच्या (वेकोलि) अंतर्गत असलेल्या सिंगोरी व भानेगाव या परिसरातील युवकांना नोकर्यांमध्ये प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

सिंगोरी व भानेगाव येथील कोळसा खाणीमुळे अडचणींचा सामना करीत असलेल्या शेतकर्यांच्या एका शिष्टमंडळाने पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट घेतली. शिष्टमंडळाचे नेतृत्व जि. प.चे माजी सदस्य हर्षवर्धन निकोसे यांनी केले. सिंगोरी येथील वेकोलिच्या खाणीमुळे या परिसरातील शेतकर्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ब्लास्टिंग होत असल्याने अनेक घरांना भेगा पडल्या आहेत. शेतातील विहीरीचे जलपातळी खाली गेली आहे. तसेच या परिसरातील स्थानिकांना रोजगार मिळत नसल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. वेकोलिच्या सीएसआर निधीतून बेरोजगारांना कौशल्य विकासासाठी योजना तयार करावी तसेच स्थानिक युवकांना रोजगारांमध्ये प्राधान्य द्यावे तसेच आंदोलन करणार्या तरुणांवर लावलेले गुन्हे मागे घ्यावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या –