कामगारांना ५० किलोपेक्षा जास्त भार वाहू देऊ नये – बाळासाहेब पाटील यांचे निर्देश

मुंबई – विविध क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या शरीरस्वास्थ्याला  व सुरक्षिततेला धोका पोहोचू नये त्यासाठी कामगारांकडून 50 किलो वजनापेक्षा जास्त मालाची हाताळणी करू नये, असे निर्देश सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत. मंत्रालयात  सहकार व पणन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कामगारांना 50 किलो वजनाच्यावर भार वाहू न देण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला … Read more

‘या’ भागातील जलसिंचन प्रकल्पांना गती देण्यात यावी – जयंत पाटील यांचे निर्देश

मुंबई – पुणे जिल्ह्यातील आंबेगाव शिरुर विधानसभा मतदारसंघातील जलसिंचन प्रकल्पांना गती देण्यात यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले. जलसंपदा विभागाच्या आंबेगाव शिरुर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. जलसंपदा मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले की, आंबेगाव … Read more

गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे दिलीप वळसे पाटील यांचे निर्देश

मुंबई – महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरु आहे. परंतु  इतर राज्यातुन येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारी, खर्रा, मावा यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन आणि विक्री … Read more

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहणार नाही याची दक्षता घ्या – वर्षा गायकवाड यांचे निर्देश

मुंबई – केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत देशभरात शुक्रवार दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (National Achievement Survey) केले जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी निवडण्यात आलेल्या सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील तसेच सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या अध्ययन … Read more

महिला व बालभवनचे काम तातडीने मार्गी लावावे!- यशोमती ठाकूर यांचे निर्देश

धुळे – महिला व बालकांशी निगडित राज्य शासनाचे विविध विभाग एकाच छताखाली आणून महिला व बालकांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी महिला व बाल भवनचे काम तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. मंत्री ॲड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात महिला व बालविकास … Read more

जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी व्यापक धोरण करा – नितीन राऊत यांचे बैठकीत निर्देश

नागपूर – नागपूर जिल्ह्यात पेंच, कर्हांडला, मोगरकसा सारखे पर्यटन स्थळांकडे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व्यापक धोरण तयार करावे, असे निर्देश नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकार्यांची बैठक झाली. यावेळी आमदार आशीष जयस्वाल, जिल्हाधिकारी आर. विमला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश … Read more

जिल्ह्यातील आठवडी बाजार सुरू करा – अजित पवार यांचे निर्देश

पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील कोविड परिस्थिती नियंत्रणात असल्याने कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आठवडी बाजार सुरू करण्याचे आणि दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी उद्याने उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. बैठकीस विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, डॉ.अमोल कोल्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला … Read more

निकृष्ट दर्जाच्या धान खरेदीवर नियंत्रण आणा – नितीन राऊत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

नागपूर – आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत निकृष्ट दर्जाचा धान खरेदी केले जात असल्याच्या तक्रारी मिळाल्या असून यावर नियंत्रण आणून यातील गुन्हेगारांवर कारवाई करावी, असे निर्देश नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले. धान खरेदी केंद्रांच्या कामाचा आढावा बैठक पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी विमला आर. उपस्थित होत्या. आधारभूत … Read more

पुनर्वसित गावातील ग्रामस्थांना मूलभूत सोईसुविधा पुरवा – बच्चू कडू यांचे निर्देश

अकोला – जिल्ह्यात रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. त्यात अकोला शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागांना जोडणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे. हे रस्ते तसेच जिल्ह्यातील शासकीय इमारतींची बांधकामे तातडीने मार्गी लावा, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री. कडू यांच्या अध्यक्षतेखाली निर्माणाधीन रस्ते व शासकीय इमारतीचे बाधकामांच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी … Read more

प्रलंबित रस्ते प्रकल्पांना कालबद्ध रितीने मार्गी लावा – उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई – राज्यातील राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पांच्या कामांचा मंत्रालयातून  नियमित आढावा घेण्यात येणार आहे.  भूसंपादन आणि वन विभागाशी संबंधित बाबींमुळे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचा लवकरच निर्णय घेऊन ही कामे मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिवांना दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री … Read more