चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी काय कराल? जाणून घ्या

धूळ, प्रदूषण, ताण-तणाव आणि इतर शारीरिक कारणं याचा थेट परिणाम चेहऱ्यावर होण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर आलेले डाग, ब्लॅक स्पॉट घालवण्याच्या नादात अनेक जण अनेक प्रकारच्या क्रिम, फेस वॉश, सनस्क्रिन लावतात. पण या सगळ्यामुळेही चेहऱ्यावर अॅलर्जी, इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊ उपाय….

  • ताक पिणं त्वचेसाठी अतिशय फायदेशीर मानलं जातं. ताकात लॅक्टिक अॅसिड आढळतं. जे चेहऱ्यावर येणारे डाग-धब्बे हटवण्यासाठी फायदेशीर ठरु शकतं. चेहऱ्यावर ज्या ठिकाणी काळे डाग आहेत, त्या ठिकाणी कापसाने ताक लावा. सुकल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा.
  • त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी लिंबू अतिशय उत्तम स्त्रोत मानला जातो. लिंबूमध्ये सी व्हिटॅमिन आणि लॅक्टिक अॅसिड असतं. लिंबू रसात दही मिसळून ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहरा चमकदार होण्यास मदत होऊ शकते. दही आणि लिंबूच्या पेस्टमध्ये थोडी साखर टाकून ती लावल्याने चेहऱ्यावरील डेड स्किन हटवून चेहरा चमकदार होण्यास मदत होते.
  • त्वचा आणि चेहऱ्याची सुंदरता कायम राखण्यासाठी कोरफड रामबाण मानलं जातं. कोरफड Black spots Removal क्रिम म्हणून काम करतं. कोरफडमध्ये व्हिटॅमिन ईचं तेल आणि लिंबू रस मिळवून ती पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने डाग जाण्यास मदत होते.
  • शद्ध चंदनामध्ये डाग कमी करण्याचे गुण असतात. चंदन पाण्यात मिक्स करून लावल्याने फायदा होतो मात्र चंदन गुलाबपाण्यात अथवा दुधामध्ये मिक्स करून लावतात.
  • जखमांच्या खुणा कमी करण्यात मध फायदेशीर आहे. काही थेंब मध जखमेच्या ठिकाणी लावा. मध आणि लिंबू मिसळूनही तुम्ही लावू शकता. मुलतानी माती लावल्यानेही चेहऱ्यावर ग्लो येतो. डाग कमी होतात.

महत्वाच्या बातम्या –