झेंडूच्या फुलांच्या किंमतीत तब्बल १८ ते २० टक्क्यांनी झाली वाढ

पुणे :मागील दोन वर्षापासून कोरोनाचे सावट असताना यावर्षी सरकारतर्फे नियंमामध्ये सुट दिली असल्याने नागरिकांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळात आहे. यामुळेच नागरिकांनी झेंडूची फुले आणि आपट्याची पाने खरेदी करण्यसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी  करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर झेंडू या फुलाला खूप महत्व असते. दरम्यान गुलटेकडी मार्केटयार्डातील फुलबाजारात झेंडूच्या फुलांची आवक वाढली आहे. तसेच मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.त्यामुळे भावात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली. घाऊक बाजारात पिवळ्या आणि केशरी झेंडूला दर्जानुसार प्रतिकिलोला 50 ते 80 रूपये भाव मिळत आहे.तर शेवंतीच्या फुलांना १०० ते १४० रुपये भाव मिळत आहे.

आवक आणि मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने फुलांच्या किमती वाढल्या असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.तसेच गेले दोन वर्ष कोरोनाचा मुकाबला करत असतांना नागरिकांना दसरा हा सण योग्य प्रकारे साजरा करता आला नाही परंतु यावर्षी कोरोना नियमामध्ये सूट दिल्याने यावर्षी नागरिकांनी बाजाराकडे आपले पाऊले वळवली आहेत.

महत्वाच्या बातम्या –