मुंबई – गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. अखेर त्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या भाषणामध्ये तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. तसेच देशाची माफीही मागीतली आहे.. हा निर्णय जाहीर करताच यावर देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मोदी सरकार शेतकाऱ्यांसामोर झुकले आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया विरोधकांकडून येत आहेत.
याबाबत महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन नाना पटोले यांच्या भाषणाची क्लिप ट्विट करण्यात आली आहे. नाना पटोले म्हणाले, बैल आडमुठा असेल तर त्याला कसं चालवायचं हे शेतकऱ्याला माहीत असतं. त्यामुळे देशाचा पंतप्रधान कितीही आडमुठा असला तरी दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांनी त्याला बरोबर चालवण्याची व्यवस्था केली.
बैल आडमुठा असेल तरी त्याला कसं चालवायचं हे शेतकऱ्याला माहीत असतं. त्यामुळे देशाचा पंतप्रधान कितीही आडमुठा असला तरी दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांनी त्याला बरोबर चालवण्याची व्यवस्था केली: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले pic.twitter.com/Mqn4wU7tbs
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 23, 2021
लोकशाही मिळाल्यानंतर एखाद्या शासनाच्या विरोधात वर्षभर आंदोलन चालू शकते हे आपण यातून बघीतलं, शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या चालवून त्यांना चिरडण्यात आलं. पंतप्रधानांवर अजुनही शेतकऱ्यांचा विश्वास नाही. आतापर्यंतचा इतिहास आहे पंतप्रधानांनी एखाद्या बाबीवर जेव्हा जेव्हा भाष्य केलं त्यावर सर्व देशाची जनता विश्वास ठेवायची, मात्र या पंतप्रधानांवर कुणाचाच विश्वास नाही. अविश्वासू पंतप्रधान देशाने पहिल्यांदा बघीतला आहे, असं नाना पटोले म्हणाले
२०१४ च्या निवडणुकांत मोदींनी सांगितलं होतं पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर करेल असे अश्वासन दिले होते आणि पंतप्रधान झाल्यानंतर ते म्हणाले मी शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणालोच नाही व्यापाऱ्यांची कर्जमाफी मी म्हणालो, असे ते म्हणाले आणि त्यामुळेच त्यांच्यावरील शेतकऱ्यांचा विश्वास संपला. तो जीआर नाही, तो कायदा आहे, त्याला लोकसभेत मांडून रद्द करावे लागणार आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी आंदोलन न संपविण्याचे स्पष्ट केले आहे. असेही पटोले यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
- रब्बी व उन्हाळी हंगामासाठी पाण्याचे काटेकोर नियोजन आवश्यक – अशोक चव्हाण
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ भागांमध्ये आणखी दोन दिवस विजांच्या कडकडाटास जोरदार पावसाची शक्यता
- तुम्ही डासांमुळे हैराण आहात ? तर मग घराच्या आवारात लावा ‘ही’ झाडं
- सावधान! पुढील 24 तासांत राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
- करटोली भाजी ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..