नवी दिल्ली: गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. अखेर त्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या भाषणामध्ये तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. हा निर्णय जाहीर करताच यावर देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मोदी सरकार शेतकाऱ्यांसामोर झुकले आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया विरोधकांकडून येत आहेत.
शेतकऱ्यांना समजवण्यात आम्ही कमी पडलो असे म्हणत मोदींनी देशाची माफी मागीतली. शेतकऱ्यांनी आपले आंदोलन संपवून घरी परत जावे, असे अवाहनही मोदींनी आपल्या भाषणातून केले. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात या संदर्भातील घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करण्यात येतील, असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं आहे. त्याच सोबत गेल्या ४ वर्षात १ लाख कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मदत करण्यात आली असल्याची माहिती ते द्यायला विसरले नाहीत. कृषी बजेट पाहिल्यापेक्षा पाच पटीने वाढल्याचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.
देशातील लहान-मोठ्या शेतकऱ्यांसाठी हे कृषी कायदे महत्वाचे ठरणार होते. मात्र काही शेतकरी गटाच्या हे लक्षात आले नाही, त्याच सोबत अनेक घटकांकडून याला विरोध होता. मात्र आंदोलन अधिक काळ सुरू न ठेवता आता कृषी कायद्यातील बदलाचे कायदेच सरकार मागे घेत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हे कृषी कायदे मागे घेण्यामागे अनेक कारणे असल्याचे बोलले जात आहे. येत्या काळात देशभरातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत, या निवडणुका लक्षात घेऊनच हे तीन कृषी कायदे मागे घेतल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या –
- जाणून घ्या, काय आहेत दुधासोबत खारीक भिजवून खाण्याचे फायदे……
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ भागांमध्ये दोन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार
- मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन वादग्रस्त कृषी कायदे घेतले मागे
- कृषी कायदा मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हे तीन कृषी कायदे आणले होते – नरेंद्र मोदी