शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात क्रीडा सुविधा निर्मितीसाठी सर्वतोपरी मदत – सुनील केदार

नागपूर – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णसेवा देणारे डॉक्टर, विद्यार्थी यांच्यावर तणाव असतो. खेळामुळे त्यांच्यावरील तणाव कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे याठिकाणी अद्ययावत वैद्यकीय सुविधांसोबतच क्रीडा सुविधा निर्मितीसाठीही सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ‘जीएमसी’ स्पोर्टस् क्लबच्या नवीन क्रीडा संकुलामधील लॉन टेनिस व बास्केटबॉल कोर्टचे उद्घाटन … Read more

शेतीसाठी दिवसा बारा तास विद्युत पुरवठा नियमित करा – सुनील केदार

नागूपर – शेतकऱ्यांचे धानाचे पीक गर्भात आहे, ते निसवण्याच्या स्थितीत आहे. अशा परिस्थितीत त्यांचे शेतीचे विद्युत कनेक्शन खंडीत करु नये. याकाळात शेतकऱ्यांना दिवसा बारा तास  नियमित विद्युत पुरवठा करा, अशा सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा  व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिल्या. कामठी व मौदा तालुक्यातील विजेच्या लोडशेडींगमुळे धान पिकाचे होणाऱ्या नुकसानीबाबत उपाययोजनेसाठी  विदर्भ … Read more

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित प्रत्यक्ष पंचनामे करा – सुनील केदार

नागूपर – अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. याबाबत त्वरित प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जावून पंचनामे करण्याचे आदेश पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी दिले. त्याबाबत पाठपुरावा करुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाईचा मोबदला देण्यात येईल, असे सांगितले. कळमेश्वर तालुक्यातील उबाळी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कृषक भारती को-ऑपरेटीव्ह कंपनी व खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या … Read more