मंत्रिमंडळ मोठे निर्णय : दि. १२ जानेवारी २०२२

मुंबई महापालिका क्षेत्रातील पाचशे फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील पाचशे चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यास आज मंत्रिमंडळाने (Cabinet) मान्यता दिली. मंत्रिमंडळ (Cabinet) बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  १ जानेवारी, २०२२ रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मुंबई महापालिकेच्या … Read more

राज्यातील सर्व शाळांमध्ये २३ ते २६ नोव्हेंबर दरम्यान “माझे संविधान, माझा अभिमान” उपक्रम राबविणार

मुंबई – संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगीकार करुन त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरीता शालेय शिक्षण विभागाच्या वतीने दि. २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत “माझे संविधान, माझा अभिमान’ उपक्रम राबविण्यात येत आहे. भारतीय राज्यघटनेतील मूलतत्त्वांची व्याप्ती आणि सर्वसमावेशकता … Read more

राज्यातील सर्व तालुक्यात टप्प्याटप्प्याने प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार – अजित पवार

अहमदनगर – कर्जत शहर व तालुक्यातील रस्ते आणि   विविध विकास कामांसाठी नियोजन करण्यात आले आहे. या विकासकामांमुळे कर्जत शहराच्या वैभवात भर पडणार आहे तसेच  राज्यातील सर्व तालुक्यात टप्प्याटप्प्याने प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. वीज व पाणी यासारख्या सार्वजनिक सुविधांच्या वापरामधे शिस्त आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कर्जत येथे केले. कर्जत शहर व  … Read more

सर्व समाजघटकांच्या प्रगतीसाठी दर्जेदार विकासकामे करा – अजित पवार

अहमदनगरसर्व समाजघटकांचा विचार करत शासन काम करत आहे. शेतकरी हिताचे अनेक निर्णय राज्याने घेतले आहेत. कोरोना व इतर अनेक नैसर्गिक संकटातही राज्यातील सर्व जिल्ह्यांना शासनाने जिल्हा नियोजनात शंभर टक्के निधी उपलब्ध करून दिला आहे. निधीचा योग्य विनियोग करून दर्जेदार विकासकामे करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले. जामखेड शहर … Read more

प्राध्यापकांचे सर्व प्रश्न सोडवून न्याय देण्यास शासन कटीबद्ध – उदय सामंत

औरंगाबाद – प्राध्यापकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून सर्व घटकांना समान न्याय देण्यासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी  केले. प्राध्यापक संघटने (बामुक्टा) तर्फे तर्द्थ प्राध्यापकांना पेन्शन मंजूर केल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा सत्कार सोहळा देवगिरी महाविद्यालयातील रवींद्रनाथ टागोर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी … Read more

राज्यातील सर्व नागरिकांना ३० नोव्हेंबरपर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लशीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट – राजेश टोपे यांची माहिती

मुंबई – राज्यातील सर्व पात्र नागरिकांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लशीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज सर्व राज्यांचा कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा आढावा घेतला. या बैठकीत श्री. टोपे मंत्रालयातून दूरदृश्यप्रणालीव्दारे सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी … Read more

राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंतांना दिवाळीपूर्वी सर्व मानधन देण्यात येणार – अमित देशमुख

मुंबई – राज्यातील वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन योजनेतील सुमारे ३० हजार पात्र मानधन धारकांच्या खात्यात दिवाळीपूर्वी सर्व मानधन जमा होईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले. श्री.देशमुख यांनी सांगितले की, ऑक्टोबर २०२१ अखेरपर्यंतचे मानधन अदा करण्यात येत असून, यासाठी २८ कोटी रुपयांची तरतूद प्राप्त झालेली आहे. राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंत … Read more

कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घ्यावा – दत्तात्रय भरणे

सोलापूर – महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाकडून मिशन युवा स्वास्थ्य उपक्रमांतर्गत कोविड विशेष लसीकरण मोहिमेची सुरुवात विद्यापीठ व महाविद्यालयांतून करण्यात येत आहे. येत्या 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमाचा 18 वर्षापुढील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन कोविशिल्ड व कोवॅक्सिन लस घ्यावी, असे आवाहन  पालकमंत्री  दत्तात्रय भरणे यांनी केले. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर … Read more

सर्व शासकीय यंत्रणांनी 30 ऑक्टोबर पर्यंत प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत – दत्तात्रय भरणे

सोलापूर – जिल्हा नियोजन समितीच्या वतीने मंजूर करण्यात आलेला निधी शंभर टक्के खर्च झाला पाहिजे. यासाठी विविध विकास कामांचे प्रस्ताव तयार करून ते तात्काळ प्रशासकीय मान्यतेसाठी दिनांक 30 ऑक्टोबर 2021 पर्यंत सादर करावेत, असे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या शासकीय विभाग प्रमुखांच्या बैठकीत पालकमंत्री भरणे बोलत … Read more

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात क्रीडा सुविधा निर्मितीसाठी सर्वतोपरी मदत – सुनील केदार

नागपूर – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णसेवा देणारे डॉक्टर, विद्यार्थी यांच्यावर तणाव असतो. खेळामुळे त्यांच्यावरील तणाव कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे याठिकाणी अद्ययावत वैद्यकीय सुविधांसोबतच क्रीडा सुविधा निर्मितीसाठीही सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ‘जीएमसी’ स्पोर्टस् क्लबच्या नवीन क्रीडा संकुलामधील लॉन टेनिस व बास्केटबॉल कोर्टचे उद्घाटन … Read more