ओमिक्रॉन विषाणूसंदर्भात मेयो, मेडिकलमध्ये स्वतंत्र कक्ष सुरु करा – नितीन राऊत

नागपूर – ओमिक्रॉन (Omicron) विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे ऑक्सिजनसह सर्व सुविधा असलेला स्वतंत्र कक्ष सुरु करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आज दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ओमिक्रॉन विषाणूपासून संभाव्य धोक्याच्या पातळीवर वरिष्ठ अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, विभागीय टास्क … Read more

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील यंत्रणा सक्षम करण्यावर भर द्यावा – अमित देशमुख

मुंबई – यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात घडलेली घटना अत्यंत गंभीर असून राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर संबंधित अधिष्ठांतामार्फत भर देण्यात यावा असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय स्थापन करण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) संदर्भात आढावा बैठक  मंत्रालयात आयोजित करण्यात आली … Read more

वैद्यकीय क्षेत्रासाठी नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम प्राधान्याने सुरु करावेत – अमित देशमुख

मुंबई – कोविडनंतर महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्र अधिक विस्तारणे आवश्यक असल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यावश्यक असणारे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम प्राधान्याने सुरु करावेत, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेप्टनंट जनरल डॉ. माधुरी कानेटकर यांनी आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली. … Read more

वैद्यकीय अधिकारी यांच्या सेवा नियमित करण्याबाबत शासन सकारात्मक – अमित देशमुख

मुंबई – शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत असलेल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भातील बैठक विधानभवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार नाना पटोले यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह,वैद्यकीय … Read more

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात क्रीडा सुविधा निर्मितीसाठी सर्वतोपरी मदत – सुनील केदार

नागपूर – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णसेवा देणारे डॉक्टर, विद्यार्थी यांच्यावर तणाव असतो. खेळामुळे त्यांच्यावरील तणाव कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे याठिकाणी अद्ययावत वैद्यकीय सुविधांसोबतच क्रीडा सुविधा निर्मितीसाठीही सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ‘जीएमसी’ स्पोर्टस् क्लबच्या नवीन क्रीडा संकुलामधील लॉन टेनिस व बास्केटबॉल कोर्टचे उद्घाटन … Read more

प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीच्या दृष्टीकोनातून नियोजन करा – अमित देशमुख

मुंबई – गेल्या दीड वर्षापासून देशासह राज्यात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यातील वैद्यकीय यंत्रणेवर ताण आल्याचे दिसून आले आहे. मात्र येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीबाबतचा दृष्टीकोन ठेवून त्यादृष्टीने काम करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा येत्या 5 वर्षातील दृष्टीकोन (प्रॉस्पेटिव्ह प्लॅन) कसा असेल यासंदर्भातील आढावा … Read more