विद्यार्थ्याला पर्यावरणाविषयी जबाबदार नागरिक बनविणार – वर्षा गायकवाड

मुंबई – शिक्षण म्हणजे केवळ शालेय अभ्यासक्रम नसून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक घडविणे याला अधिक महत्त्व आहे. वातावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये जागृतीसाठी पर्यावरण विभागाने अतिशय उपयुक्त अभ्यासक्रम तयार केला असून शालेय शिक्षण विभाग त्याची कालबद्ध अंमलबजावणी करून आपली जबाबदारी निश्चित पूर्ण करेल, असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले. राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय … Read more

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ – वर्षा गायकवाड

मुंबई – राज्यात कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या आणि 2022 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक अथवा कायदेशीर पालक/ दत्तक पालक गमावलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना … Read more

इंग्रजीतील संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी विद्यार्थ्यांना पहिलीपासून दैनंदिन वापरातील शब्द शिकवावेत – वर्षा गायकवाड

मुंबई – राज्यात मराठी भाषेतून शिक्षण अनिवार्य आहे. तथापि, शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच मराठीसोबतच इंग्रजीतील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व मराठी माध्यम शाळांत पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना मराठी बरोबरच इंग्रजी भाषेतील संज्ञा, संकल्पना अधिक … Read more

शैक्षणिक अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्यांबाबत सविस्तर माहिती व्हावी – वर्षा गायकवाड

मुंबई – भारतीय संविधान हे जगातील सर्वात विस्तृत आणि सर्वसमावेशक संविधान म्हणून ओळखले जाते. विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच या संविधानातील मूल्य माहिती होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमामध्ये त्यांचा सविस्तर समावेश करण्यात यावा, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड यांनी दिले. शालेय अभ्यासक्रमात संविधानिक मूल्यांचा सविस्तर समावेश करण्यात यावा, याबाबतची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या … Read more

शाळेची घंटा वाजणार: राज्यात १ डिसेंबर पासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू होणार

मुंबई – कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता 1 डिसेंबरपासून ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तसेच शहरी भागातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा एकनाथ … Read more