ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते. या आरोग्यदायी ज्वारीचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.
- पोटांच्या सामाशांवर उपयुक्त ठरते – ज्वारीत मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे त्याने पोट साफ होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना एसिडिटीचा त्रास आहे त्यांनी चपातीच्या ऐवजी आहारात ज्वारीची भाकरी समाविष्ट करावी. ज्वारीच्या सेवनाने मुळव्याधीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते.
- ब्लडप्रेशर व हृदयासंबंधित आजार – सध्याब्लडप्रेशर आणि हृदयासंबंधित आजारांच्या समस्या वाढल्या आहेत. या दोन्हीवर मात करायची असेल तर आहारात ज्वारीचे सेवन गरजेचे आहे. ज्वारीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
- एनिमियाचा त्रास कमी होतो – ज्वारीत भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. एनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो.
- मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरते – ज्वारी शरीरातीलइन्शूलिनची पातळी प्रमाणात ठेवण्यास मदत करते त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ज्वारीची भाकरी अत्यंत गुणकारी ठरते.
- लठ्ठपणा कमी होते – सध्या लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा (अतिरिक्त चरबी) कमी होण्यास मदत होते.
- किडनी स्टोनचा त्रास कमी होते – ज्वारीत असणारी पोषक तत्व किडनीस्टोनला आळा घालतात, त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास होणाऱ्या व्यक्तीने ज्वारीची भाकरी किंवा इतर स्वरूपातील ज्वारीचे पदार्थांचा आहारात नक्की समावेश करावा.
- कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते – ज्वारीचे सेवन रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त असते. त्यामुळे तुम्ही ज्वारीची भाकरी खात नसाल तर आहारात ज्वारीच्या भाकरीचा नक्की समावेश करा.
महत्वाच्या बातम्या –
- मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. २७ ऑक्टोबर २०२१
- अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही – राजेंद्र शिंगणे
- सर्दी-खोकला बरा करण्यासाठी काय कराल? जाणून घ्या
- राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी
- राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; अतिवृष्टीग्रस्तांना तब्बल २ हजार ८६० कोटींचा निधी मंजूर