हिवाळ्यात आपल्या आहार विहाराच्या सवयी बदलतात. या बदलांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. आहारातल्या बदलांमुळे आपलं वजनही वाढू शकतं. हिवाळ्या आपल्या शरीरातही अनेक बदल होतात. चला तर मग जाणून घेऊ
- हिवाळ्यात दुध, तुप, लोणी यांचा आहारात समावेश करावा. यामध्ये भरपूर प्रमाणात स्निग्धता, कॅलरीज असतात. त्यामुळे हिवाळ्यातील उष्णतेचे संतुलन राखण्यास मदत होते.
- गाजर हे चांगले पोषण करणारे, उष्ण व मधुर रसात्मक आहे. त्यात ‘अ’ जीवनसत्त्वही उत्तम प्रमाणात आहे. त्यामुळे हिवाळ्यात गाजर कोशिंबिरीच्या स्वरूपात किंवा तसेच कच्चे खाता येईल, गाजराचा घरी रस काढून घेता येईल, गाजराचा हलवा हा तर अनेकांच्या आवडीचाच पदार्थ असतो.
- हिवाळ्यात स्निग्ध गुणांचा, बृहण करणारा, उष्ण आणि मधुर गुणांचा लसूण हिवाळ्यासाठी उत्तम आहे. लसणीत कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला साठा असतो. पोट साफ होण्यासाठी बोरे मदत करतात. लहान मुलांसाठी बोरे उत्तम टॉनिकसारखे काम करतात. त्यात मेंदू व मज्जातंतूंचे टॉनिक असल्यासारखे घटक आहेत.
- तसेच हिवाळ्यात त्वचेखालच्या लहान रक्तवाहिन्यांचे विस्तारण करून शरीराला उबदार वाटण्याचा अनुभव देणारा लसूण आहे. बदाम, काजू, मणूका, अक्रोड इ. सुका मेव्यामध्ये स्निग्ध उष्ण गुणधर्म असल्याने त्याचा आहारात समावेश करावा.
महत्वाच्या बातम्या –
- मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. २७ ऑक्टोबर २०२१
- अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही – राजेंद्र शिंगणे
- सर्दी-खोकला बरा करण्यासाठी काय कराल? जाणून घ्या
- राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी
- राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; अतिवृष्टीग्रस्तांना तब्बल २ हजार ८६० कोटींचा निधी मंजूर