मुंबई – गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. अखेर त्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या भाषणामध्ये तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. हा निर्णय जाहीर करताच यावर देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मोदी सरकार शेतकाऱ्यांसामोर झुकले आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया विरोधकांकडून येत आहेत.
आता यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे, हा शेतकऱ्यांच्या अभूतपुर्व एकजुटीचा विजय असून या आंदोलनाची देशाच्या इतिहासात व जगात नोंद घेतली जाईल, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
यासंदर्भात श्री. भुजबळ म्हणाले, आज सकाळीच एक चांगली बातमी ऐकायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी मंजूर केलेले कृषी कायदे सर्व मागे घेतले आहेत. त्याबद्दल एक वर्षाहून अधिक काळ लाखो शेतकरी आंदोलन करीत होते. त्या कायद्यांना विरोध करीत होते. उत्तर प्रदेश सीमेवर धरणे धरून बसले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेण्यामागे अनेक कारणे आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणूकांमध्ये भाजपाला मोठे अपयश मिळाले. आता पुन्हा उत्तर प्रदेश सहीत अनेक प्रांताच्या निवडणुका येत आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्याची आवश्यकता भासली की काय याचा विचार आपल्याला करावा लागेल. पण असे असले तरी देर आये दुरुस्त् आये. सर्व शेतकऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, असे भुजबळ म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
- जाणून घ्या, काय आहेत दुधासोबत खारीक भिजवून खाण्याचे फायदे……
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ भागांमध्ये दोन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार
- मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन वादग्रस्त कृषी कायदे घेतले मागे
- शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हे तीन कृषी कायदे आणले होते – नरेंद्र मोदी
- हवामान विभागाचा मोठा अंदाज; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावासाची शक्यता