मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. अखेर त्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या भाषणामध्ये तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. हा निर्णय जाहीर करताच यावर देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मोदी सरकार शेतकाऱ्यांसामोर झुकले आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया विरोधकांकडून येत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संभाषणात मोठी घोषणा करत वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याचे सांगितले. आता या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. मोदी सरकारने कायदे मागे घेतले हे योग्यच झालं असंही त्यांनी सांगितलं. कोणतीही चर्चा न करता केंद्र सरकारने हे कायदे आणले. त्यामुळे या कायद्याला विरोध झाला. देशाच्या इतिहासात एक वर्षाहून अधिक काळ शेतकरी सीमेवर बसले. थंडी, ऊन, वारा, पावसाचा विचार न करता शेतकरी संघर्ष करत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढायला हवा होता. पण त्यांनी हे केलं नाही. तिन्ही कायदे मागे घ्या असं शेतकरी संघटनेने सांगितलं.
पण ऐकलं नाही. त्यामुळे संघर्ष झाला. उत्तर प्रदेशचा काही भाग राजस्थान, पंजाब हरयाणातील लोक या आंदोलनात होते. आता पंजाब, उत्तर प्रदेशात निवडणुका आल्या. निवडणूक प्रचारासाठी गावात गेल्यावर शेतकरी जाब विचारतील हे लक्षात आल्यावर केंद्र सरकारने कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. उशीरा का होईना शहाणपण आलं. याचं दु:ख व्यक्त करत नाही, असं सांगतानाच एक वर्ष संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना मी सलाम करतो, असं पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ भागांमध्ये दोन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार
- जाणून घ्या, काय आहेत दुधासोबत खारीक भिजवून खाण्याचे फायदे……
- कृषी कायदा मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन वादग्रस्त कृषी कायदे घेतले मागे
- …….म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे तीन कृषी कायदे मागे घेतले
- शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हे तीन कृषी कायदे आणले होते – नरेंद्र मोदी