औरंगाबाद – प्राध्यापकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून सर्व घटकांना समान न्याय देण्यासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
प्राध्यापक संघटने (बामुक्टा) तर्फे तर्द्थ प्राध्यापकांना पेन्शन मंजूर केल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा सत्कार सोहळा देवगिरी महाविद्यालयातील रवींद्रनाथ टागोर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्वश्री आमदार सतिश चव्हाण, विक्रम काळे, अंबादास दानवे, उच्च व तंत्र शिक्षण संचालक डॉ.धनराज माने, यशवंत शितोळे यांच्यासह प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. यावेळी ‘करीअर कट्टा’ बॅनरचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
संघटनेने मांडलेल्या प्राध्यापकांच्या विविध मागण्या यामध्ये प्राचार्यांची रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण अनुसार भरणे, विद्यापीठ कायद्याबाबत तज्ज्ञ व्यक्तींचे मत विचारात घेऊन फेरविचार करणे, प्राध्यापकांची रिक्त पदांची भरती, तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ, यासह इतर प्रश्नांबाबत सकामरात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन श्री.सावंत यांनी यावेळी दिले.
महत्वाच्या बातम्या –
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढचे 3 दिवस वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता
- हवामान अंदाज : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या मुसळधार पाऊस कोसळणार
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अंदाज
- त्वचेवर खाज येते असेल तर मग करा ‘हे’ घरगुती उपाय!
- सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे