Share

शासन खंबीरपणे नुकसानग्रस्त नागरिकांच्या पाठीशी – यशोमती ठाकूर

Published On: 

🕒 1 min read

अमरावती – नुकसानग्रस्तांचे पूर्ण नुकसान भरून काढणे शक्य नसले तरी शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रत्यक्षात जेवढे नुकसान झाले आहे तेवढी भरपाई देण्याचा प्रयत्न नवीन शासन निर्णयानुसार केला आहे. नुकसानग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे त्यांनी खचून न जाऊ नये, असा दिलासा पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी शेतकरी बांधवांना दिला.

जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळ व   अतिवृष्टीमुळे  नागरिकांच्या घरांची पडझड व नुकसान झाले. नुकसानग्रस्त नागरिकांच्या घराच्या  नुकसानीची पाहणी व पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच शासनाकडून त्यांना मदत देण्यात आली आहे. त्या संबंधातील तिवसा व भातकुली तालुक्यातील  नुकसानग्रस्तांना धनादेशाचे वाटप आज पालकमंत्री श्रीमती ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते  करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

वऱ्हाच्या सरपंच निलिमा समरीत, उपसरपंच अंकुश बाहतकर, जिल्हा परिषद सभापती पूजा आमले, तिवसा पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे, जिल्हा परिषद सदस्य जयंत देशमुख, उपसभापती शरद वानखेडे, तिवस्याचे उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, तहसीलदार वैभव फरतारे, गटविकास अधिकारी चेतन जाधव आदी उपस्थित होते

तिवसा तालुक्यातील  वऱ्हा येथील ५३ व साऊर येथील १७५  आपद्ग्रस्तांना धनादेशाचे वाटप श्रीमती ठाकूर यांनी केले. तिवसा तालुक्यातील ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे सोयाबीन कापूस व तूर या पिकांचे नुकसान झाले त्यासाठी 18 कोटी 60 लक्ष रुपये निधी  प्राप्त झाला असल्याची माहिती श्रीमती ठाकूर यांनी दिली. सप्टेंबर महिन्यामध्ये देखील जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची पाहणी, पंचनामे प्रक्रिया पूर्ण होताच नुकसानग्रस्तांना लवकरच  मदत उपलब्ध करून देण्यात येईल असे श्रीमती ठाकूर यांनी इथे सांगितले.  वऱ्हा येथील शहीद कृष्णा समरीत सभागृहात  धनादेशचे वाटप करण्यात आले. पंचायत समिती सदस्य कल्पना दिवे, निलेश खुळे, अब्दुल सत्तार उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –  

बाजारभाव (Market Prices) राजकारण (Politics)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या