कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी आता साडेतीनशे रुपयांत; खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी – राजेश टोपे यांची माहिती

मुंबई – राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले आहेत. कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी ३५० रुपये आकारण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून खासगी प्रयोगशाळांमध्ये … Read more

राज्यात आतापर्यंत तब्बल १३२.७६ लाख क्विंटल साखर उत्पादन

राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यात यावर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत तब्बल १४९ साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप सुरू केले आहे. तर यामध्ये राज्यातील ७५ खासगी व या मध्ये राज्यातील ७४ सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. तर राज्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत तब्बल १४९.४२ लाख टन उसाचे गाळप तयार करण्यात आले आहे. राज्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत तब्बल १३२.७६ लाख … Read more

राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी – सुनील केदार

मुंबई – महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री. केदार बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. ए. पातूरकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. … Read more

दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांना २२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार – वर्षा गायकवाड

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2022 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या (फॉर्म नं. 17 भरून) प्रविष्ट होण्यासाठी 22 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन … Read more