सध्या बाजारात फणसाच्या गऱ्याचा गोड वास दरवळताना दिसतो. जगातील सर्वात मोठे फळ म्हणून फणसाकडे बघीतले जाते. बंगळुरू, गोवा, कोकण या ठिकाणी फणसाची झाडे जास्त आढळतात. फणसाकडे पाठ फिरवणारे लोक अधिक आहे. फणसामध्ये विविध औषधी गुण आढळून येतात. फणसामध्ये तुम्हाला पोटॅशियम, कॅल्शियम, फॉलिक ऍसिड, मॅग्नेशियम,फायबर, आयर्न, अ आणि क जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याने हे बहुगुणी फळ खाण्याचा सल्ला दिला जातो.
- फणसात अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. फणसात असणारे विटॅमीन ए डोळ्यांची शक्ती चांगली ठेवते. तसेच त्वचा उजळण्यासाठीसुद्धा तो फायदेशीर ठरते.
- भरपूर प्रमाणात लोह असल्याने अॅनिमियासारख्या विकारांवर फणस खाणे फायद्याचं ठरतं
- हाडांसाठी फणस खाणे खूप गुणकारी असते. या फळात असलेले मॅग्नेशियम आणि कॅल्शिअम हाडांसाठी गुणकारी असते.
- फणसामध्ये डाएटरी फायबर्स आणि पाण्याचे प्रमाणही मुबलक असते. यामुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. आयुर्वेदानुसार, कच्चा फणस पचनक्रियेचा त्रास असणार्यांफसाठी पचायला कठीण, त्रासदायक ठरू शकतो.
- पिकलेल्या फणसमुळे कफ होतो, त्यामुळे सर्दी-खोकला, अजीर्ण इत्यादी आजार तसेच गर्भवती स्त्रियांनी फणस सेवन करू नये. तसेच फणस सेवन केल्यावर पान खाण्यामुळे पोट फुगते. त्यामुळे फणस खाल्ल्या नंतर पान खाऊ नये.
महत्वाच्या बातम्या –