नाशिक – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या महिन्यात अवकाळी पाऊस (Untimely rain) पडला. या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, हवामानात मोठ्या प्रमाणात बद्दल होत असल्याने शेती पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे, एकीकडे अवकाळी पावसासह गारपीटी तर एकीकडे थंड हवामान यामुळे अनेक पिकांचे नुकसान होत आहे.
या वातावरणामुळे द्राक्ष (Grapes) , डाळिंब, शेवगा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. ढगाळ हवामान यामुळे द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, या वातावरणामुळे द्राक्ष (Grapes) बागेत भुरी रोगास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. कोरडे वातावरण आणि कमी तापमान अशा अनुकूल परिस्थितीमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असतो. भुरी रोगामुळे द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
भुरी रोगाची सुरुवात कशी होते? जाणून घ्या
रोगामुळे पाने व फांद्या वाळतात व फळे तडकतात अथवा कुजतात. रोगाची सुरुवात पानांच्या वरच्या बाजूवर लहान हिरवट पिवळ्या ठिपक्यांच्या स्वरूपात होते. हे ठिपके आकारमानाने वाढतात आणि तपकिरी रंगाचे होतात. हवा दमट असल्यास पानांच्या खालच्या बाजूवर पांढरट रंगाची कवकाची लवदार वाढ आढळून येते. काही दिवसांनी पाने वाळतात, ठिसूळ बनतात व नंतर गळून पडतात. मोठ्या प्रमाणावर पाने गळाल्यास फळे सुरकुततात व कुजतात. थंड, ढगाळ व दमट हवा या रोगाच्या वाढीसाठी पोषक असते. कोरड्या व उष्ण हवेत हा रोग वाढू शकत नाही.
भुरी रोगाची लक्षणे –
- पानांच्या खालील बाजूस काळसर रंगाचे डाग दिसून येतात. सुरुवातीला पानावर पिवळसर पांढरट ठिपके व नंतर ते भुरकट होऊन संपूर्ण पान काळपट दिसते. वाढत्या प्रसारासोबत हे डाग मोठे व भुरकट रंगाचे होत जातात.
- रोगाचा प्रादुर्भाव वेलीच्या सर्व हिरव्या भागावर होतो. मात्र बुरशीचे धागे प्रत्यक्ष वेलीच्या भागात प्रवेश न करता पृष्ठभागावरच वाढतात.
- रोगग्रस्त वेलीची वाढ खुंटून पानात विकृती येते.
- पावसाळ्याच्या दिवसांत कमी पाऊस आणि ढगाळ वातावरणामध्ये वाऱ्यामार्फत भुरी रोगाचा प्रसार अधिक प्रमाणात होतो.
- फुलोरा अवस्थेत रोगाची लागण झाल्यास फलधारणा होत नाही. फळ धारणेच्या वेळी प्रादुर्भाव असल्यास मणी अनियमित आकाराचे होतात. काही मणी अपक्वच राहतात. पांढऱ्या रंगाच्या बुरशीचा थर मण्यांवर येऊन मणी तडकतात व फुटतात.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात थंडीचा कडाका वाढला; ‘या’ जिल्ह्याचा तापमानाचा पारा 7 अंशावर
- महाआवास अभियानाच्या लाभासाठी जिल्ह्यात मोहिम राबवा – जयंत पाटील
- सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे
- काळजी घ्या! देशात गेल्या २४ तासात 2 लाख 68 हजार 833 कोरोनाबाधितांची नोंद
- जिल्हा वार्षिक योजना वर्ष २०२२-२३ यासाठी 308 कोटी 40 लाखाच्या रुपयाच्या प्रारुप आराखड्यास मान्यता