शेतकऱ्यांना दिलासा, राज्यातील 19 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा

जगभरात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर भारतातही खबरदारी म्हणून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. याचा परिणाम राज्यातील शेतकऱ्यांवरही झाला आहे. आता कुठं शेतकऱ्यांनी कष्टानं शेतात पीक उत्पादन केलं होतं, त्यातच लॉकडाऊनने बाजारपेठेवर मोठे दुष्परिणाम झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं मोठं नुकसान होत आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करून काही प्रमाणात दिलासा दिला आहे.

रेडी बंदरावरील जहाजातील चिनी प्रवाशांसह अन्य कोणाला कोरोनाची लक्षणे नाहीत

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकासआघाडीने राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर नव्याने कर्जमाफीची घोषणा केली होती. त्याचीच अंमलबजावणी सध्या होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत नुकतीच याबाबत माहिती दिली. राज्यातील जवळपास 19 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. ३१ मार्च अखेर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. याचा राज्यातील थेट १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय पार्थ स्वत: घेईल – अजित पवार

महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत ३१ मार्च पर्यंत राज्यातील १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ११,९६६.२१ कोटी रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे. जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत १० लाख ४० हजार ९३५ शेतकऱ्यांच्या खात्यात ५,४०७ कोटी १३ लाख रुपये जमा करण्यात आले. तसेच व्यापारी बँकांच्या माध्यमातून ८ लाख ४८ हजार ५९३ शेतकऱ्यांच्या खात्यात ६,५५९ कोटी ८० हजार रुपये जमा करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

हे सरकार शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यातून कायमचं बाहेर काढणार – उद्धव ठाकरे

कृषी क्षेत्राला चालना देतानाच शेतकरी चिंतामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल – दादाजी भुसे

अजित पवारांनी ५० कोटी वाटून माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकली – रंजन तावरे