‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा’ अडीच लाख शेतकऱ्यांनी घेतला लाभ

अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात ०१/१२/२०१८ पासून राबवण्यास सुरुवात झाली. २ हेक्टर पर्यत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रती हप्ता रुपये २००० म्हणजेच वार्षिक ६००० अर्थसाह्य दिले जाते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली होती. ४ फेब्रुवारी २०१९ रोजी योजनेला केंद्राने मान्यता मिळाली.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; शेतकरी कर्जमुक्तीची तारीख ठरली आणि मुदतही!!

या योजनेतून सांगली जिल्ह्यातील २ लाख ७० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर १५३ कोटी रुपये जमा झाले असल्याची माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे त्यानुसार सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले होते. या योजनेसाठी सांगली जिल्ह्यातील पात्र खातेदारांची संख्या ४ लाख ९७ हजार आहे. त्यापैकी ३ लाख ९५ हजार प्रस्तावापैकी आजअखेर ३ लाख १७ हजार शेतकऱ्यांचे ऑनलाउन अर्ज पात्र ठरले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काजू बागायतदारांना फटका

तसेच केंद्राने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आणखी काही शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन-दोन हप्ते जमा केले आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान जमा झालेल्या शेतकऱ्यांची संख्या २ लाख ७० हजार ५१९ एवढी आहे.

महत्वाच्या बातम्या – 

कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी येत्या महिन्याभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार

दुष्काळ व कर्जाला कंटाळून विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू