सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला – सोनिया गांधींची प्रतिक्रिया

नवी-दिल्ली  –  गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. अखेर त्या आंदोलनाला मोठे  यश  आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. काल सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या भाषणामध्ये तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली.  सेच देशाची माफीही मागीतली आहे. हा निर्णय जाहीर करताच यावर देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मोदी सरकार शेतकाऱ्यांसामोर झुकले आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया विरोधकांकडून येत आहेत.  या तीन कृषी कायद्यांचे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. सोबतच वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी केली. दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी  यांनी हा शेतकऱ्यांच्या बलिदानाचा विजय असल्याचे म्हटले आहे.

सोनिया म्हणाल्या की, ‘७०० हून अधिक शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी न्यायाच्या या लढ्यात बलिदान दिले आहे.  त्यांचे बलिदान सार्थकी लागले आहे.  सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला आहे. लोकशाहीत कोणताही निर्णय प्रत्येक संबंधितांशी सल्लामसलत करून आणि विरोधकांशी सल्लामसलत करून घ्यावा. मला आशा आहे की मोदी सरकारने भविष्यासाठी काहीतरी धडा शिकला असेल.’ तसेच गांधीवादी आंदोलनाच्या तब्बल १२ महिन्यांनंतर आज देशातील ६२ कोटी अन्नदाते-शेतकरी-शेतमजुरांच्या संघर्षाचा आणि इच्छाशक्तीचा विजय झाला आहे, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, पुढे केंद्र सरकारवर निशाणा साधत सोनिया म्हणाल्या की, ‘आज सत्तेत असलेल्या लोकांनी शेतकऱ्यांविरोधात रचलेलं षडयंत्रही पराभूत झालं आणि हुकूमशाही राज्यकर्त्यांचा अहंकार देखील. आज रोजीरोटी आणि शेतीवर हल्ला करण्याचा कटही फसला. आज तिन्ही काळे शेतीविरोधी कायदे पराभूत झाले आणि अन्नदाता जिंकला.’

महत्वाच्या बातम्या –