कोबी ही पालेभाजी असून िहदीमध्ये बंद गोभी इंग्रजीमध्ये कॅबेज, शास्त्रीय भाषेमध्ये ब्रासिका ओलेरासिया या नावाने ओळखली जाते. कोबीला पानांवर पाने चिकटलेली असल्यामुळे शतपर्वा असेही म्हणतात. कोबी हा क्रुसिफेरी या कुळातील आहे. कोबी ही भाजी पूर्वी भारतात प्रचलित नव्हती युरोपीय लोकांनी ही भारतात आणली. भारतात कोबीचे पीक सर्वत्र घेतले जाते. सहसा हिवाळी पीक म्हणून त्याच्या बी पासून रोपे तयार करून लागवड केली जाते. पांढरट-हिरवा व लाल जांभळा अशा दोन प्रकारच्या कोबीच्या जाती आहेत. जाणून घ्या फायदे…
- कोबी कप होण्यापासून सुटका करते. कोबी खल्ल्यामुळे पोट साफ राहते. तसेच पचनतंत्र चागले राहते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. त्यामुळे अनेक आजारातून सुटका होते.
- कोबीमुळे मज्जातंतू आणि मेंदूचे काम चांगले चालते. कॅन्सरचा धोकाही कोबीमुळे टळतो. कॅन्सर होण्यापासून कोबी मदत करतो.
- कोबीमधील पोटॅशियम एक महत्त्वपूर्ण खनिज आणि इलेक्ट्रोलाइट आहे. हे हृदय गती आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पोटॅशियम शरीरातील सोडियमच्या नकारात्मक परिणामाविरूद्ध रक्तवाहिन्या भिंतींना आराम देते आणि लघवीद्वारे सोडियम तयार करण्यास मदत करते. लाल रक्तपेशीच्या निर्मितीसाठी कोबीमधील मॅंगनीज देखील आवश्यक आहे.
- हार्ट अॅटॅकचा धोका कोबीमुळे टळतो. कोबी फायबर युक्त असल्याने रक्तवाहिन्या चांगल्या प्रवाही राहतात. कोबीत अमिनो आम्ल असते. तसेच शिजवलेली कोबी खाल्ल्याने कोलेस्ट्रोल कमी होऊ शकते.
- तुम्हाला तुमची भूक क्षमवायची असेल आणि वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही कोबी खाच. १०० ग्रॅम कोबीत २५ कॅलरीज असतात. कोबी हा फायबर युक्त असतो. त्यामुळे लगेच भूक लागत नाही. कोबीमध्ये उच्च जीवनसत्त्वे असल्याने ते आरोग्यवर्धन आहे.
- कोबीमध्ये डोळ्यातील आजार रोखणारे अँटीऑक्सिडेंट असतात. यात बीटा कॅरोटीन आहे, जे व्हिटॅमिन एमध्ये रूपांतरित करते आणि डोळ्याच्या आरोग्यास फायदे देते. व्हिटॅमिन ए डोळ्यांना बळकट करते, रात्रीच्या दृश्यासाठी कार्ये सुधारित करते आणि डोळ्यांची वृद्धिंग रोखते.
महत्वाच्या बातम्या –
- हवामान अंदाज : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता
- लॉकडाऊन येऊ द्यायचा नाही या निर्धाराने आरोग्याचे नियम पाळा – उद्धव ठाकरे
- ‘कुछ नही होता यार’ हे अजिबात चालणार नाही – उद्धव ठाकरे
- देशात गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ कोरोना रुग्णांची नोंद
- राज्यातील द्राक्षे, नारळ, केळी, ड्रॅगन फ्रुट यांसह फुलांचा रोजगार हमी योजनेत समावेश – संदिपान भुमरे
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढच्या २४ तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता