मुंबई – एक चांगली बातमी आहे की गेल्या काही आठवड्यांपासून देशात कोरोनाची रुग्णसंख्या 10 हजारांपेक्षा कमी आहे. तर देशात गेल्या 24 तासांत ८ हजार नवीन कोरोना रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. तर देशात गेल्या २४ तासात ९ हजारांहून अधिक कोरोनमुक्त झाले आहे. मात्र, देशात गेल्या २४ तासात 236 जणांचा मृत्यू झाला.
तर यात एक चांगली बातमी आहे की सक्रिय रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. तर सध्या देशात कोरोनाचे १ लाख ३ हजार ८५९ सक्रिय रुग्ण आहेत. तर हा आकडा तब्बल ५४४ दिवसांनंतरचा सर्वात कमी आहे. तर देह्स्त आतापर्यंत तब्बल 4 लाख 68 हजार 790 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
तर देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर यामध्ये देशातील केरळ, मणिपूर, गुजरात , महाराष्ट्रसह इतर राज्यांमध्ये बाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार आहे.
- हवामान अंदाज : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता
- लॉकडाऊन येऊ द्यायचा नाही या निर्धाराने आरोग्याचे नियम पाळा – उद्धव ठाकरे
- कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा; केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला
- राज्यातील द्राक्षे, नारळ, केळी, ड्रॅगन फ्रुट यांसह फुलांचा रोजगार हमी योजनेत समावेश – संदिपान भुमरे
- राज्यात २५ नोव्हेंबरपर्यंत १६२.३७ लाख क्विंटल साखर उत्पादन