‘हे’ उपाय केले तर मिनिटात डोकेदुखी होईल कमी

डोके दुखी हे एक कॉमन प्रॉब्लम आहे. याचे बरेच कारणं असू शकतात, जसे डोळ्यांची समस्या, अपच, ऊन लागणे, अनियमित मासिक धर्म, सायनास, ताप, रजोनिवृत्ती, निरंतर चिंता, मानसिक तणाव, उशीरा रात्रीपर्यंत जागणे, अनिद्रा, दुखी राहणे, कडक उन्हात फिरणे थकवा, दारू आणि इतर मादक पदार्थांचे सेवन इत्यादी.  चला तर मग जाणून घेऊ उपाय

  • सर्दी, खोकला किंवा सायनसमुळे डोकेदुखीचा त्रास होत असेल तर एक चमचा ओवा भाजून तो सुती कपड्यात बांधावा आणि वेदना होत असलेल्या ठिकाणी त्याने शेकावं. यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होतो.
  • आपल्या हाताचा अंगठा आणि तर्जनीमध्ये असणाऱ्या जागेत हलका मसाज करण्यात सुरुवात करा. दोन्ही हातांवर अशी क्रिया करा. यामुळे एकाच मिनिटात डोकेदुखी कमी होईल.
  • सुंठ सुकी आलं असते. याची एक चमचा पावडर घ्या. पाणी टाकून त्याची पेस्ट बनवा आणि गरम करुन घ्या. यानंतर हे मिश्रण कपाळावर लावा. थोड्याच वेळात डोकेदुखी थांबेल.
  • पुदिन्याची पानं आणि पुदिन्याच्या तेलात मेंथॉल असतं. ते मेंदुतील रक्तवाहिन्यांना मोकळं करण्यासाठी फायदेशीर ठरतं. एक चमचा जैतूनच्या तेलात पुदिन्याचा तेवढाच रस मिसळावा. त्यानंतर तो लेप कपाळाला लावल्यास डोकेदुखी गायब होते.
  • एका ग्लासमध्ये गरम पाण्यात लिंबाचा रस घालून प्यायला पाहिजे. जर गॅसमुळे डोकं दुखत असेल तर लगेचच आराम मिळेल.

महत्वाच्या बातम्या –