माहित करून घ्या सफरचंद सालासकट खावे की नाही?

आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहावे, यासाठी नियमित एक तरी सफरचंद खाल्ले पाहिजे, असा सल्ला डॉक्टर देतात. शक्यतो आपण सफरचंद त्याच्या सालासकटच खातो. पण हल्ली फळांवर फवारण्यात येणारी कीटकनाशके आणि फळांच्या आवरणाची चकाकी टिकून राहण्यासाठी त्यावर लावण्यात येणारे मेणाच्या लेपामुळे सध्या फळे सालासकट खावीत की नाही?

हा सध्या चर्चेचा मुद्दा बनला आहे. फळांवर फवारण्यात येणारी कीटकनाशकं आणि मेणाचा थर आरोग्याच्या दृष्टीनं हानिकारक असतात, ही बाब मान्य आहे. पण काही फळांच्या सालामध्येही पोषकतत्त्वे असतात, ही तत्त्वे टिकून राहावी, यासाठी कीटकनाशकं फवारणे आवश्यक असते ही गोष्टदेखील आपण विचारात घेतली पाहिजे. यामुळए सफरचंद सालासकट खावे की खाऊ नये?हे आपण जाणून घेऊया.

सफरचंदाच्या साल फायबरयुक्त
सफरचंदाच्या साल ही फायबरयुक्त असते. सालासकट सफरचंदाचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास कमी होतो. शिवाय, यामुळे तुम्हाला सारखी भूकदेखील लागत आहे आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यासही मदत करते.

जीवनसत्त्वाची मात्रा असते अधिक

सफरचंदाच्या सालामध्ये जीवनसत्त्व क आणि अ चे प्रचंड प्रमाण आहे. एका सफरचंदाच्या सालामध्ये 8.4 एमजी जीवनसत्त्व क आणि 98 IU जीवनसत्त्व अ चे सरासरी प्रमाण असते. त्यामुळे सफरचंदाची साल काढून खाल्ल्यास सालामध्ये प्रचंड प्रमाणात असणारी जीवनसत्त्वंही आपण केराच्या टोपलीत टाकतो.

 कर्करोगनियंत्रित करते
सफरचंदाच्या सालामध्ये भरपूर प्रमाणात ट्रायटरपेनॉइडनावाचे पोषकतत्त्व असते. हे पोषकतत्त्व शरीरातील कर्करोगाच्या पेशींचा खात्मा करतात. शिवाय, यामध्ये अॅन्टीऑक्सिडन्ट्सचेही प्रचंड प्रमाण असते, त्यामुळे फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो.

 श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुलभ होते
सफरचंदाच्या सालामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे तत्त्व असते. यामुळे फुफ्फुसांचे कार्य सुधारते. जी लोक आठवड्यातून 5 किंवा त्याहून अधिक सफरचंद खातात, त्यांची श्वसनप्रणाली अधिक चांगल्या पद्धतीनं कार्य करते.

 वजन नियंत्रणात आणते
जर तुम्हाला अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं वजन घटवायचे असेल तर सालासकट सफरचंद खा. यामध्ये असलेले Ursolic अॅसिड लठ्ठपणाविरोधात लढते.

पोषकतत्त्वयुक्त सफरचंद
सफरचंदाच्या सालामध्ये पोटॅशिअम, कॅलशिअम, फॉलेट, लोह आणि फॉसफरस ही पोषकतत्त्वे असतात. शरीराचे सर्व कार्यपद्धती सुरळित पार पडावी, यासाठी ही पोषकतत्त्वे महत्त्वपूर्ण कामगिरी बजावतात.

महत्वाच्या बातम्या –