तजेलदर त्वचेसाठी करा ‘हा’ उपाय, जाणून घ्या

मुंबई : आपल्याला माहितीच असेल केळी आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहित आहे का केळीची साल त्यापेक्षही अधिक फायदेशीर आहे. आपल्या घरात डझनभर केळी आणली जातात, आणि मग त्यांना खाऊन त्याची साले फेकून दिली जातात आले. परंतु आपणास माहित आहे की, आपण फेकून देत असलेल्या फळाची साल आपली त्वचेची निगा राखू शकते, तसेच दात देखील उजळवू शकते. इतकेच नाही तर केसांचे आरोग्य देखील सुधारू शकते. चला तर, जाणून घेऊया केळ्याच्या सालाचे आरोग्यदायी फायदे.

  • केळीची साल त्वचेवर चोळल्यास त्वचेही चमक वाढते आणि सुरकुत्या कमी होतात.
  • त्याचबरोबर ही साल चेहर्‍यावरील डागही कमी करण्यातही मदत करते.
  • केळीची साल चेहऱ्यावर चोळताना किंवा थोडावेळ चेहऱ्यावर ठेवल्यामुळे त्वचा हायड्रेट देखील होते.
  • सकाळी झोपेतून उठल्यानंतर जर तुमचे डोळे सुजल्यासारखे दिसत असतील, तर केळीची साल ही समस्या कमी करण्यासाठी वापरली जाऊ शकते. यासाठी ही साल आपल्या डोळ्यांवर थोडावेळ ठेवून पडून राहा.

वापरापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!

  • वापरासाठी केळ्याची साल नेहमी ताजी असावी.
  • केळीची साल साठवून ठेवू नका.
  • केळी बर्‍याच लोकांना पचत नाहीत. अशा लोकांनी कोणत्याही प्रकारे त्याचा त्वचेवर वापर करू नये.
  • सालाची पेस्ट राहिल्यास ती रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येते. तथापि, एका दिवसापेक्षा जास्तकाळ ठेवू नका.
  • केळीची साल सोलल्यानंतर किंवा चेहऱ्यावर वापरल्यानंतर तुम्हाला काही समस्या आल्यास त्याचा वापर थांबवा.

टीप : त्वचेशी संबंधित समस्यांवर कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसंच दुसऱ्या व्यक्तीचे स्किन केअर रुटीन फॉलो करण्याची चूक करू नये. कारण प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार वेगळा असतो.

महत्वाच्या बातम्या –