भरपूर पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

डॉक्टर आणि वैद्य नेहमीच भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. खरे म्हणजे पाणी हे आपल्या शरीराचा अविभाज्य भाग आहे. आपले शरीर प्रामुख्याने पाण्याचेच बनलेले आहे. परंतु आपल्या पिण्यात कमी पाणी आले की शरीरातील चयापचय क्रियांचा समतोल ढासळतो. म्हणून भरपूर पाणी पिले पाहिजे. पाण्यामुळे आपल्या शरीराचा पाणीदारपणा कायम राहतो. पाण्याचे आपल्या आरोग्यावर होणारे काही चांगले परिणाम असे आहेत.

भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी काही प्रमाणात रक्तातून बाहेर फेकली जाते आणि अशी चरबी कमी झाल्याने वजन नियंत्रणात राहते. पाण्यामध्ये कसलेच उष्मांक नाहीत. त्यामुळे पाणी प्यायल्याने वजन वाढत नाही. रोग प्रतिकारशक्ती वाढते. त्याचा फायदा फ्ल्यू, कर्करोग आणि हृदयविकार असणार्‍या रुग्णांना होतो.

मायग्रेनमुळे होणारी डोकेदुखी आणि पाठीचे दुखणे यामागे अनेक कारणे असतात परंंतु डीहायड्रेशन हे मुख्य कारण समजले जाते आणि अशा डोकेदुखीच्या आणि पाठदुखीच्यावेळी भरपूर पाणी पिले की वेदना कमी होतात. भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा तुकतुकीत होते. त्यासाठी महागडी सौंदर्य प्रसाधने वापरण्याची गरज नाही.

सतत काहीतरी खावेेसे वाटणारे काही लोक असतात आणि त्यांच्या या सवयीमुळे त्यांचे वजन वाढत असते. त्यांनी भरपूर पाणी प्राशन केले की पोट भरल्याची जाणीव होते आणि खाणे कमी होऊन वजन कमी व्हायला मदत होते.

महत्वाच्या बातम्या –