भारतातील लसीकरणाचा आकडा आज १०० कोटींचा टप्पा पार करणार

नवी दिल्ली – भारत आज एक मोठ विक्रम करणार आहे. भारतातील लसीकरणाचा आकडा आज १०० कोटी टप्पा पार करणार आहे आणि हा विक्रम आज देशभरात साजरा करण्यात येणार आहे. आतापर्यंत जगात फक्त चीनने १०० कोटींहून अधिक लसीकरण केले आहे.

आता यामध्ये भारत देशही १०० कोटींचा टप्पा पार करणार आहे. आतापर्यंत १८ वर्षांवरील ७५ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ३१ टक्क्यांहून अधिक लोकांचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. देशात १८ ते ४४ वयोगटातील ५५,२९,४४,०२१, ४५ ते ५९ वयोगटातील २६,८७,६५,११० आणि ६० वर्षांवरील १६,९८,२४,३०८ लोकांचे देशात लसीकरण करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी लसीकरण करून भारताच्या ऐतिहासिक लसीकरण मोहिमेत योगदान देण्याचे आवाहन केले आहे. देश लसीचे शतक बनवण्याच्या जवळ आहे. या सुवर्ण संधीचा एक भाग होण्यासाठी, मी देशवासियांना आवाहन करतो की ज्यांना अद्याप लसीकरण करणे बाकी आहे त्यांनी त्वरित लसीकरण करून भारताच्या या ऐतिहासिक सुवर्ण लसीकरण प्रवासात योगदान द्यावे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान आज या ऐतिहासिक विक्रमात देशातील सर्वात मोठा खादी तिरंगा गुरुवारी लाल किल्ल्यावर लसीकरणाअंतर्गत दिलेले १०० कोटी डोस पूर्ण झाल्यावर फडकवला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या –