हिवाळ्यात काही लोकांचे ओठ सतत फाटतात. अधिक प्रमाणात सौंदर्य प्रसाधने वापरल्यानेही ओठांचे सौंदर्य नष्ट होते. ओठ सुंदर आणि नरम राहण्यासाठी पुढे दिलेले घरगुती उपाय करून पाहा…
- ओठांचे पापुद्रे निघत असतील, ओठांना चीर पडत असेल तर रात्री ओठांना बदाम तेल लावा.
- विलायची बारीक करून लोण्यामध्ये मिसळून हे मिश्रण दिवसातून दोन वेळेस लावल्यास ओठ नरम होतील.
- रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर ओठांवर दुधाची साय, लोणी किंवा तुपाने हलक्या हाताने मालिश करा.
- ओठ फाटण्यावर रामबाण उपाय म्हणजे मोहरीचे तेल किंचित गरम करून रात्री झोपताना नाभीवर लावा. हा आयुर्वेदिक उपाय अतिशय चमत्कारी आहे. १२ तासांत परिणाम दिसतील.
- दही, लोणी यात केसर मिसळून ओठांना लावल्याने ओठ हळूहळू गुलाबी होतात.
- प्रत्येक ऋतूमध्ये ओठ सुंदर आणि नरम ठेवण्यासाठी देशी गुलाबाच्या पाण्यात भिजवलेल्या काही पाकळ्या ओठांवर रगडा. या उपायाने ओठ गुलाबी आणि चमकदार होतील. यामुळे लिपस्टिक लावण्याची गरज भासणार नाही.
महत्वाच्या बातम्या –
- मराठवाड्यातील पहिली योजना, सीएनजीमार्फत घरोघरी मिळणार पाईपलाईनद्वारे गॅस
- जिरायतसाठी १० हजार, बागायतीसाठी १५ हजार, व बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रु. प्रति हेक्टर मदत देणार – बाळासोब थाेरात
- ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मिळणार ५५५.३९ कोटी
- अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य – विजय वडेट्टीवार