पुणे – कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्याची चिन्हे दिसत असतांनाच आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढले आहे. दक्षिण आफ्रिकेसह बोट्स्वाना, हाँगकाँग या भागात आढळून आलेल्या ओमिक्रोन या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरातल्या सर्वच देशांची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली असून मुख्यमंत्री सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत याबाबत बैठक घेतील, असे सांगितले आहे.
पुण्यात पार पडलेल्या कोरोना आढावा बैठकीत बोलत असतांना पवार म्हणाले की,’आपल्याकडे परिस्थिती बरी आहे. परंतु जागतिक पातळीवर नवीन व्हेरिएंटचा फैलाव होत आहे. उद्या पंतप्रधान देशातील मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. राज्यात नवीन व्हेरिएंट आला तर काही बंधन आणावी लागतील अशी स्थिती आहे. सध्या पुणे जिल्ह्यात समारंभांसाठी ५० टक्के उपस्थितीचे बंधन हटवण्यात आले आहे. आता शाळा देखील पूर्ण क्षमतेने सुरू करत आहोत. तसेच १ डिसेंबर पासून सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहेत.’
दरम्यान, पुढे बोलत असतांना ‘पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील जम्बो कोविड सेंटर ३१ डिसेंबर पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यावेळी आढावा बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. तसेच सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवला नियमांचे पालन करून परवानगी असणार आहे. विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत केंद्र सरकार जी नियमावली तयार करेल तिचे पालन केले जाईल’, अशी माहिती देखील पवार यांनी दिली.
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- प्रत्येक मंदिरासमोर कासव का असते? जाणून घ्या
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये 29 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबरला विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
- पेरूच्या पानांचे आपण कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे, जाणून घ्या
- तुमच्या शरीरात Vitamin D ची कमतरता तर नाही ना? जाणून घ्या Vitamin D च्या कमतरतेची लक्षणं