‘ड’ जीवनसत्त्व आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. मधुमेह, रक्तदाब, हाडांचे आरोग्य, केसांचे आरोग्य, दातांचे आरोग्य इत्यादी अनेक बाबींमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व महत्त्वाची भूमिका बजावते. ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी हाडे, दात, केस यांचे आरोग्य धोक्यात येतेच; शिवाय मधुमेह, रक्तदाब इत्यादी व्याधी नियंत्रणात येणे अवघड असते.
‘ड’ जीवनसत्त्व खाण्याच्या पदार्थामधून मिळतेच तसेच सूर्यप्रकाशापासून आपले शरीरसुद्धा ‘ड’ जीवनसत्त्व तयार करते. सूर्यप्रकाशातील यूव्हीबी किरण ‘ड’ जीवनसत्त्व तयार करण्यासाठी जास्त मदत करतात. हिवाळ्यामध्ये उन्हाची तीव्रता कमी असते. यूव्हीबी किरण कमी प्रमाणात असतात. शिवाय थंडीमुळे आपण स्वेटर्स, जॅकेट, सॉक्स इत्यादींमध्ये स्वत:ला गुरफटून घेतल्याने त्वचेपर्यंत सूर्यकिरण जास्त प्रमाणात पोहचू शकत नाहीत. जे ‘ड’ जीवनसत्त्वाच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. म्हणून ‘ड’ जीवनसत्त्वयुक्त पदार्थ आहारात आवर्जून घेणे गरजेचे आहे. मासे, कॉड लिव्हर ऑइल, ताजे लोणी, चीज, मशरूम, अंडय़ातील पिवळा भाग, सोयाबीन, दूध, टोफू इत्यादी गोष्टींमधून ‘ड’ जीवनसत्त्व मिळते. पण जर आपल्या शरीरात ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता असेल तर काय आहेत त्याची लक्षणं ते आपण पाहुयात.
थकवा – तुम्ही योग्य आहार घेत आहात, पुरेशी झोप घेत आहात, तरीदेखील तुम्हाला थकवा जाणवत असेल, तर तुमच्या शरीरात ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता असू शकते.
हाडं आणि स्नायूंमध्ये वेदना – ‘व्हिटॅमिन डी’ हाडं आणि स्नायूंसाठी आवश्यक असतं, त्यामुळे जर तुमची हाडं आणि स्नायूंमध्ये वेदना होत असतील तर हे ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेचं लक्षण असू शकतं.
जखम उशिराने भरणं – तुम्हाला जखम झाली आणि ती बरी होण्यास खूप वेळ लागत असेल, तर हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं.
मूडमध्ये बदल – महिलांमध्ये ‘व्हिटॅमिन डी’चा अभाव असेल, तर त्यामुळे तणाव उद्भवतो. महिलांच्या मूडमध्ये बदल होत राहतो, त्यांच्यामध्ये उदासीनता, निराशा येते.
केस गळणं – केस गळण्यावर तुम्ही भरपूर उपचार केलेत, मात्र फरक पडत नाही. तुमचे केस भरपूर प्रमाणात गळत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण हेदेखील व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचं एक लक्षण आहे.
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये 29 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबरला विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
- प्रत्येक मंदिरासमोर कासव का असते? जाणून घ्या
- पेरूच्या पानांचे आपण कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे, जाणून घ्या
- शेतकऱ्यांना मोठा दिलासा : बाजार समितीमध्ये लाल कांद्याला पहिल्याच दिवशी मिळाला तब्बल ‘इतका’ दर